Hirakni Hat: लातूरमध्ये हिरकणी हाटचे उद्घाटन झाले, ज्यामुळे स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली. हा उपक्रम महिला स्वावलंबनाला प्रोत्साहन देतो.
लातूर (Hirakni Hat) : जिल्हा स्तरीय बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “हिरकणी हाट” (Hirakni Hat) या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील याच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास जि.प. उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राज्य कृषी मूल्य अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, प्रकल्प संचालक संजय इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच जिल्हा परिषद विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
गावखेड्यातून आलेल्या या (Hirakni Hat) गटाच्या ताईंनी प्रामाणिकपणे आपल्या जिद्दीने तयार केलेले विविध पदार्थ हे नक्कीच नाविन्यपूर्ण असून ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. या बचत गटाच्या यशाच्या उत्सवाला सर्व लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल कुमार मीना म्हणाले, 'हिरकणी हाट'मध्ये मिळणाऱ्या विविध वस्तू आणि पदार्थ हे कायमस्वरूपी उपलब्ध होतील, यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिरकणी मॉल ही संकल्पना राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व हिरकणीचे उत्पादने एका छताखाली येणार आहेत.
जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, वैयक्तिक व्यवसाय कर्ज विनियोग कशा पद्धतीने महिलांनी करावा याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलाना विविध कर्ज वितरण धनादेश मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार व आकर्षक उत्पादनांचे कौतुक केले. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन मिळावे आणि महिलांना आर्थिक स्वावलंबन साधता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी सर्व मान्यवरांनी बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन स्टॉलवरिल विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांचे कौतुक करून महिलाना प्रेरित केले. जिल्हा व्यवस्थापक पांडुरंग जेटनवरे यांनी आधार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खुदासे यांनी केले. *Hirakni Hat( कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जिल्हा व्यवस्थापक वैभव गुराळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी पार पडण्यासाठी सर्व जिल्हा व्यवस्थापक, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुक व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व उमेद समुदाय संसाधन महिला तसेच गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.