Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली त सूर्याचा प्रकोप

सूर्याचा प्रकोप: तापमानाचा पारा 40 अंशांकडे; रस्ते पडले ओस

Hingoli Heat Wave : हिंगोलीत उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील रस्त्यांवर व शासकीय कार्यालयांच्या परिसरात ओस पडले आहे. नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत.


सूर्याचा प्रकोप तापमानाचा पारा 40 अंशांकडे रस्ते पडले ओस

Hingoli Heat Wave |

प्रमुख शासकीय कार्यालय परिसर पडले ओस

हिंगोली (Hingoli Heat Wave ) : शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आज शहराचे तापमान अंदाजे ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचल्याने दुपारच्या वेळी शहरात अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते ओस पडले आहेत.

प्रमुख कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट

नेहमी लोकांच्या गर्दीने गजबजलेले असणारे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आज दुपारी शुकशुकाट दिसून आला. शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली असून, या परिसरातील रस्ते आणि परिसर दुपारच्या सुमारास पूर्णपणे शांत झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे डांबरी रस्ते तापत असल्याने वाहनधारकांनीही रस्त्यावरून फिरणे टाळले आहे.

​तज्ज्ञ डॉक्टरांचा सतर्कतेचा इशारा
वाढत्या उन्हाच्या (Hingoli Heat Wave) पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असतो, त्यामुळे या काळात विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, डोक्याला रुमाल बांधणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

​नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने आपला इंगा दाखवण्यास सुरुवात केली आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असल्याने व्यापारी पेठांवरही याचा परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक आता पावसाची किंवा गारव्याची प्रतीक्षा करत आहेत.

Related to this topic: