Prof. Sham manav: हिंगोलीत 6 मे रोजी प्रा. शाम मानव यांच्या ‘बुवा तेथे बाया’ विषयावरील व्याख्यान होणार. या कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर संघटनांनी केले आहे.
Prof. Sham manav |
हिंगोली (Prof. Sham manav) : हिंगोली येथे बुधवार, 6 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुवाबाजी विरोधी अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
व्याख्यानाचे प्रमुख वक्ते अंनिसचे संस्थापक प्रा. शाम मानव (Prof. Sham manav) आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर राहणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
या व्याख्यानात भोंदू बाबांकडून महिलांची व भक्तांची होणारी फसवणूक, श्रद्धेच्या नावाखाली होणारे आर्थिक व शारीरिक शोषण, ढोंगी बाबांना ओळखण्याच्या पद्धती आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या माध्यमातून बुवाबाजीला आळा कसा घालता येईल यावर प्रा. शाम मानव (Prof. Sham manav) मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप, प्रज्ञा सुर्य फाउंडेशन, सोशल एज्युकेशन मूव्हमेंट व लहुजी साळवे कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास असलेल्या सर्व पुरोगामी संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.