Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली मांडूळ साप

हिंगोलीत दुर्मिळ मांडूळ सापाची सुखरूप सुटका; अंधश्रद्धांवर प्राणीमित्रांनी केले प्रबोधन

Hingoli Mandul snake: हिंगोलीत दुर्मिळ मांडूळ सापाची सुटका करण्यात आली. प्राणीमित्र ओम जाधव आणि इतरांनी नागरिकांना या सापाविषयीच्या गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी माहिती दिली.


हिंगोलीत दुर्मिळ मांडूळ सापाची सुखरूप सुटका अंधश्रद्धांवर प्राणीमित्रांनी केले प्रबोधन

Hingoli Mandul snake |

हिंगोली (Hingoli Mandul snake) : शहरातील राज्य राखीव दलातील पोलीस निरीक्षकांच्या वसाहतीजवळ  15 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता रस्त्याच्या बाजूने जात असलेला दुर्मिळ मांडूळ जातीचा साप नागरिकांच्या निदर्शनास आला. साप दिसताच तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तातडीने वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्राणीमित्र ओमभाऊ जाधव यांना पाचारण केले. 

माहिती मिळताच ओमभाऊ जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षित पद्धतीने मांडूळ सापाला (Hingoli Mandul snake) पकडले. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये मांडूळ सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मांडूळ दुतोंडी असतो, त्याच्यापासून गुप्तधन मिळते, ब्लॅक मॅजिकसाठी त्याचा वापर होतो किंवा त्याचे तेल औषधी असते या सर्व निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

वास्तविक मांडूळ (Hingoli Mandul snake) हा पूर्णपणे बिनविषारी, शांत स्वभावाचा साप असून तो उंदीर, घुशी खाऊन शेतकऱ्याला मदत करतो. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या शेड्युल 4 अंतर्गत या सापाला संरक्षण असून त्याची तस्करी करणे गंभीर गुन्हा आहे, असेही त्यांनी सांगितले. सापाला पकडल्यानंतर वन विभागाचे विभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सचिन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार , जामकर , शेळके, बेंद्रे , शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली तो वनविभाग हिंगोली यांच्या स्वाधीन करण्यात आला. 

या मोहिमेत प्राणीमित्र ओम जाधव यांच्यासोबत संतोष जाधव, अर्जुन घोलप, रामप्रसाद जाधव, मुरलीभाऊ कल्याणकर, पवन खरात व साहिल चौधरी उपस्थित होते. 
आवाहन: मांडूळ साप (Hingoli Mandul snake) किंवा कोणताही वन्यजीव दिसल्यास त्याला मारू नका. तातडीने वनविभाग किंवा वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संस्था, हिंगोली - 9604146082 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राणीमित्र ओम जाधव यांनी केले आहे.

Related to this topic: