Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली झाड आग

हिंगोलीत रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग; तत्परतेमुळे अनर्थ टळला

Hingoli tree fire: हिंगोलीच्या रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग लागली. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. नियमित पाहणीची मागणी.


हिंगोलीत रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग तत्परतेमुळे अनर्थ टळला

Hingoli tree fire |

हिंगोली (Hingoli tree fire) : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज दुपारच्या सुमारास एका जुन्या लिंबाच्या झाडाला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानावर असलेल्या लिंबाच्या झाडाने अचानक पेट घेतला आणि (Hingoli tree fire) ज्वाळा दिसू लागल्या. घटनास्थळाजवळच वेल्डिंगचे काम करणारे मेकॅनिक मझर भाई यांचे लक्ष जाताच त्यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी तात्काळ हिंगोलीच्या तहसीलदारांना याबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदारांनी तातडीने नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशामक बंबाची मागणी केली.

माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक कर्मचारी शेख अमजद, अरुण उबाळे आणि सुभाष मोठे हे बंबासह काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाण्याचा जोरदार मारा करून झाडाला लागलेली आग (Hingoli tree fire) पूर्णपणे आटोक्यात आणली. वेळीच केलेल्या या कारवाईमुळे झाड जळून खाक होण्यापासून वाचले. रामलीला मैदानाचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे मझर भाई आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. उन्हाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी मैदानावरील झाडांची नियमित पाहणी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. सध्या पोलिसांकडून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.

Related to this topic: