Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली बेमुदत बंद

हिंगोली जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यासाठी बेमुदत बंद

Hingoli closed indefinitely: हिंगोली जिल्ह्यात कृषी विक्रेत्यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला. सरकारच्या दुर्लक्षामुळे विविध तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला.


हिंगोली जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यासाठी बेमुदत बंद

Hingoli closed indefinitely |

हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव कडकडीत बंद

हिंगोली (Hingoli closed indefinitely) : कृषी केंद्र चालकाच्या प्रलंबीत मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या निषेधार्थ कृषी विक्रेत्याने संप पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील या संपाला प्रतिसाद देत कृषी निविष्ठा विक्रेत्याने २७ एप्रिल सोमवार रोजी जिल्ह्यात ७५० कृषी केंद्र बंद ठेवून कृषी केंद्र चालकानी संपात सहभाग घेतला, त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. 

हिंगोलीत कृषी विक्रेत्याचा कडकडीत बंद
हिंगोली कृषी केंद्र चालकाच्या अनेक दिवसापासून असलेल्या प्रलंबीत मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कृषी केंद्र चालकांनी पुकारलेल्या बंदला हिंगोली शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असून सोमवारी विक्रेत्यांनी शहरातील ८० कृषी केंद्र बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला, वारंवार पाठपुरावा करून देखील कारवाई होत नरसल्याने कृषी विक्रेत्यांनी बंदचे अस्त्र पुकारले. याला मोठा प्रतिसाद मिळाला असून कृषी केंद्र चालकाच्या प्रलंबीत मागण्या मान्य कराव्यात यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कृषी केंद्र चालक संतोष आखरे, माऊली वानखेडे, राहुल झांजरी, केदार बजाज, शिवाजी मुटकुळे, दिलीप बांगर, संजय घुगे, रितेश अग्रवाल, जाधव, बन, आनंद निलावार आदी सहभागी झाले होते.

सेनगावात कृषी केंद्राला कडकडीत बंद

सेनगाव: कृषी केंद्र व्यवसायीकाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपाला सेनगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २७ एप्रिल सोमवारी रोजी तब्बल २०० हून अधिक कृषी केंद्र चालक सहभागी झाले होते.

कृषी केंद्र चालकांनी दुकाने दिवसभर बंद ठेवत प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली. परिणामी, खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीवर पूर्णतः परिणाम झाला. कृषी केंद्र चालकांच्या या आंदोलनामागे परवाना प्रक्रियेतील अडथळे, कंपन्यांकडून होणारा असमतोल पुरवठा, दरांतील अनियमितता आणि बाजारात वाढलेली बनावट बियाणे खते विक्री ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, दुकाने बंद राहिल्याने पेरणी व पिकसंवर्धनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. खते व औषधांच्या अभावामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले. मात्र, दीर्घकालीन हितासाठी हा लढा आवश्यकच, असा ठाम पवित्रा कृषी केंद्र चालकांनी घेतला. याच पार्श्वभूमीवर सेनगाव तालुका कृषी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी तहसील कार्यालयात नायव तहसीलदार सरोदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी तालुका अध्यक्ष हरिष झंवर, उपाध्यक्ष विकास सुर्वे, सचिव प्रताप कोटकर, कोषाध्यक्ष शिवशंकर यस्के यांच्यासह मुटकुळे, सारंगधर रोडगे, कुंडलीक तिडके, दामोदर पतंगे, सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, कृषी क्षेत्रातील वाढत्या असंतोषाकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

वसमतमध्ये बंदला प्रतिसाद
वसमत: कृषी साहित्य विक्री केंद्र कडकडीत बंद राहिले त्यामुळे बी बियाणे व सखत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सोमवारी कृषी केंद्र कडकडीत बंद राहिले कृषी साहित्य विक्रेत्यांच्या अडचणींबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने, बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. विविध मागण्या संदर्भात हा बंद पुकारण्यात आला. शेतकऱ्यांना लिंकिंगमुळे होणारा त्रास व अप्रमाणित बियाण्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा बंद पुकारला आहे. खरिप २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे वसमत मध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्व कृषी विक्री केंद्र बंद आहेत.

औंढा ना. येथे कृषी विभागाला दिले निवेदन

औंढा नागनाथ: तालुका सीड्स पेस्टिसाइड अॅड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन औंढा नागनाथ यांच्या वतीन बेमुदत कृषी सेवा केंद्र बंद ठेवत आंदोलन पुकारले आहे. या संदर्भाने कृषी सेवा केंद्र चालकानी विविध मागणीचे निवेदन औंढा नागनाथ तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे दिले आहे. औंढा तालुका सीड्स पेस्ट अँड फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष कमलेश मुसळे, उपाध्यक्ष वायकोस महावीर, सचिव गजानन पाटील, विजयकुमार झांजरी, लक्ष्मण पवार, माधव भदरोड, संतोष देशमुख, विकी सेठ झांजरी, सत्यनारायण अग्रवाल, सचिन पवार यांच्यासह औंढा नागनाथ, जवळा बाजार, शिरड शहापूर येथील कृषी सेवा केंद्र चालकाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कळमनुरीत ३३ कृषी केंद्राचा बंदमध्ये सहभाग
कळमनुरी माफदा या संघटनेत्त्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत कळमनुरी शहरातील ३३ कृषी केंद्र चालकांनी २७ एप्रिलपासून आपली दुकाने बंद ठेवून बेमुदत संपात सहभाग नोंदविला आहे. कृषी केंद्र चालकांवर शासन व खत-बियाणे कंपन्यांकडून लादल्या जाणाऱ्याा अन्यायकारक अटीविरोधात हा तीव्र लढा पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात आबासाहेब लोंढे, रावसाहेब शिंदे, विशाल टवले, गजानन देशमुख, पिंटू जिंतूरकर, अनिल चेंडके, प्रदीप शिंदे, पांडुरंग भोसकर, गोविंद मनियार, आबासाहेब देशमुख, दिलीप पोले, अनिल टवले आदी कृषी केंद्र चालकांनी सक्रिय सहभाग घेतला. या बंदमुळे शेतकऱ्यांना खत, बियाणे व कृषी औषधांच्या खरेदीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: