Dussehra office fire: हिंगोलीच्या रामलीला मैदानावरील दसरा महोत्सवाच्या कार्यालयास ५ मे रोजी अचानक आग लागली, ज्यामुळे कार्यालयातील काही साहित्य जळाले. आगीचे कारण अज्ञात आहे.
हिंगोली (Dussehra office fire) : शहरातील रामलीला मैदानावर असलेल्या दसरा महोत्सवाच्या कार्यालयास ५ मे मंगळवार रोजी अचानक आग लागली यामुळे कार्यालयातील काही सामान जळाले वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली.
येथील रामलीला मैदानावर दसरा महोत्सव समितीचे कार्यालय आहे येथे काही जुने साहित्य ठेवण्यात आले आहे मंगळवारी अचानक येथे धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर येथे पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन (Dussehra office fire) आग आटोक्यात आणली तोपर्यंत काही साहित्य जळाले आहे यामध्ये टेबल, खुर्च्या व इतर काही साहित्याचा समावेश आहे. आग कशामुळे लागली हे मात्र कळाले नाही.