Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली दामिनी पथक

हिंगोलीत दामिनी पथकाची धडक कारवाई; असभ्य वर्तन करणाऱ्या इसमावर प्रतिबंधक कारवाई

Hingoli Damini Squad: हिंगोलीमध्ये दामिनी पथकाने पेट्रोलिंग करून असभ्य वर्तन करणाऱ्या एका इसमावर कायदेशीर कारवाई केली.


हिंगोलीत दामिनी पथकाची धडक कारवाई असभ्य वर्तन करणाऱ्या इसमावर प्रतिबंधक कारवाई

Hingoli Damini Squad |

हिंगोली (Hingoli Damini Squad) : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दामिनी पथकाने 16 एप्रिल ला प्रभावी गस्त घालून धडक कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखालीप्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्या नेतृत्वाखाली मपोशि आरती साळवे, पोशि गणेश सोनटक्के, मपोह नंदा धोंगडे व चापोह हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने बसस्थानक, शाळा-महाविद्यालय परिसर, कॅफे व गार्डन भागात पेट्रोलिंग केले.

यादरम्यान जिजामाता नगर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरातील गार्डनमध्ये एक इसम जोरजोरात आरडाओरड करून असभ्य वर्तन करत सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याचे आढळले. पथकाने तात्काळ हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 110/117 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई केली.

सदर गार्डन परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस असल्याने विद्यार्थी व बाहेरगावचे युवक-युवती मोठ्या प्रमाणात येतात. मंदिर परिसरात फोटो काढणे, आरडाओरड करणे व असभ्य वर्तनाच्या वारंवार तक्रारी येत असल्याने ही विशेष गस्त घेण्यात आल्याचे सपोनि प्रेमलता जगताप यांनी सांगितले. मागील आठवड्यातही औंढा नागनाथ उद्यान येथे अशाच प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 7 इसमांवर कलम 110/117 अन्वये कारवाई करण्यात आली होती.

हिंगोली शहर व जिल्ह्यात कुठेही असभ्य वर्तन खपवून घेतले जाणार नाही. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा (Hingoli Damini Squad) दामिनी पथकाने दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणाऱ्यांची माहिती डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related to this topic: