Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भगवान परशुराम शोभायात्रा

भगवान परशुरामाच्या जयघोषात, ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभा यात्रा

Lord Parashuram Yatra: १९ एप्रिल रोजी हिंगोलीत श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ढोल-ताशाचा समावेश होता.


भगवान परशुरामाच्या जयघोषात ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभा यात्रा

Lord Parashuram Yatra |

हिंगोली (Lord Parashuram Yatra) : श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने १९ एप्रिल रविवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुरामाच्या जयघोषात व ढोल ताशाच्या निनादामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचे अनेक ठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

१९ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील मंगळवारा दत्त मंदिर भागातून दुपारी ४ वाजता भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्ताने  भव्य शोभायात्रा बॅन्ड, ढोल ताशाच्या गजरात प्रारंभ झाली. ही शोभायात्रा माहेश्वरी भवन, मसानीपेठ, मारवाडी गल्ली, कपडा गल्ली, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका ते एनटीसी भागातील (Lord Parashuram Yatra) परशुराम उद्यानात विसर्जित झाली. या शोभायात्रेत भगवान परशुरामा सह अनेक सजीव देखावे सादर केले करण्यात आले होते. महात्मा गांधी चौकात शोभायात्राचे स्वागत नगरपरिषद शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांनी केले.

यावेळी नगरसेवक विशाल गोटरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. बँन्ड, ढोलताशाच्या गजरात ,टाळ मृदंगाचा निनाद करीत ही शोभायात्रा परशुराम उद्यानात विसर्जित झाली.  या ठिकाणी शोभायात्रा (Lord Parashuram Yatra) आल्यानंतर रात्री ७ वाजता महाआरती झाली. महाआरती नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला. शोभायात्रेमध्ये सकल ब्राम्हण समाजातील महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related to this topic: