Mahatma Basaveshwar: हिंगोलीमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या 921व्या जयंतीचे उत्सव साजरे करण्यात आले. आमदार तान्हाजीराव मुटकुळे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
हिंगोली (Mahatma Basaveshwar) : 19 एप्रिल रोजी हिंगोली शहरात समता नायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 921 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, हिंगोली नगरपालिकेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, माजी नगराध्यक्ष व जिल्हा वीरशैव सभेचे अध्यक्ष सुधीर सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwar) यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचन स्तंभाचे सुशोभीकरण करून, महात्मा बसवेश्वराचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले, त्यासोबतच हिंगोली नगर पालिकेचे गटनेते शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांनीही महात्मा बसवेश्वरांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय स्तरावर लागणारी आवश्यक ती मदत आम्ही करून देऊ असे हिंगोली शहराच्या लिंगायत बांधवांना आश्वासित केले. त्यासोबतच याप्रसंगी हिंगोली नगरपालिकेचे नगरसेवक नाना नायक, विशाल गोटरे, खली बांगर, कैलास शहाणे, सुमित कांबळे, कपिल खंडेलवाल, भाजप युवा मोर्चाचे रामरतन शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी महिला प्रतिनिधी म्हणून सविताताई सराफ, सौ. अर्चना तडकसे, सौ. ज्योती मदाम, सौ. ऍड. मीराबाई टाले उपस्थित होत्या, तसेच ज्येष्ठ समाज बांधव शिवशंकर अप्पा सराफ, माळोदे आप्पा, प्राचार्य रामदास मुकटे, भीमाशंकर आप्पा सराफ, श्याम स्वामी, दरगु अप्पा, शिवानंद आप्पा होकर्णे उपस्थित होते.
या (Mahatma Basaveshwar) जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पिंटू टाले, महेश जैनापुरे, नागेश सराफ, प्रा. बस्वराज लक्षटे, प्रा. महेश्वर मंगनाळे, चंदू उबाळे, संदीप टाले, निखिल निंबाळकर, नागेश संगेकर, नागेश लिंगायत, विलास गोठरे, सतीश मलशेठवार, रामेश्वरे अप्पा, जिरवणकर सर, मनोज होकर्णी, बाळू कानबाळे, साईराज खंदाडे, शिवराज टाले, निकु शेटे यांनी परिश्रम घेतले. तसेच, याप्रसंगी जिल्हा वीरशैव लिंगायत सभा, जिल्हा शिवा संघटना, जिल्हा बसव ब्रिगेड व सर्व लिंगायत बांधव यांनी एकत्रित येऊन आपल्या एकजुटीने या जयंती उत्सवात सहभाग नोंदवला.