Hingoli Agaar Bus: हिंगोली आगाराने उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी 24 जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. विविध मार्गांवर ही सेवा उपलब्ध असेल.
हिंगोली (Hingoli Agaar Bus) : उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराने विशेष नियोजन केले आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत हिंगोली आगारातून विविध मार्गांवर 24 जादा बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. राप हिंगोली आगार व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रवाशांनी या जादा वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीकांत महाजन यांनी केले आहे. उन्हाळ्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर व बीड या मार्गांवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. ती लक्षात घेऊन खालील जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत:
पुणे व छत्रपती संभाजीनगर मार्गावर हिंगोली - पुणे मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 7:00 वाजता, पुणे - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 11:00 वाजता, हिंगोली - पुणे मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 10:00 वाजता, पुणे - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर मार्गावर रात्री 10:00 वाजता, हिंगोली - छत्रपती संभाजीनगर: सकाळी 6:30, दुपारी 12:30 व 2:00 वाजता, छत्रपती संभाजीनगर - हिंगोली: सकाळी 11:30, दुपारी 12:30, सकाळी 5:30 व 6:30 वाजता आहे. नाशिक मार्गावर हिंगोली - नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगर: सकाळी 9:30 वाजता, नाशिक - हिंगोली मार्गे छत्रपती संभाजीनगर: रात्री 10:30 वाजता आहे.
वर्धा व अमरावती मार्गावर
हिंगोली - वर्धा मार्गे पुसद: सकाळी 5:30 वाजता,वर्धा - हिंगोली मार्गे पुसद: सकाळी 11:30 वाजता, हिंगोली - अमरावती मार्गे वाशीम कारंजा: सकाळी 5:30 व 8:00 वाजता, अमरावती - हिंगोली मार्गे वाशीम कारंजा: सकाळी 11:30 व दुपारी 2:30 वाजता आहे.
बीड व लातूर मार्गावर
हिंगोली - बीड मार्गे पाथरी: सकाळी 5:00 व 7:00 वाजता, बीड - हिंगोली मार्गे पाथरी: सकाळी 11:30 व दुपारी 2:00 वाजता, हिंगोली - लातूर मार्गे परळी: दुपारी 1:00 वाजता, लातूर - हिंगोली मार्गे परळी: सकाळी 5:30 वाजता
आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे एसटी बसेसला मोठी मागणी असते. (Hingoli Agaar Bus) प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हे जादा नियोजन केले आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोली आगार व्यवस्थापक श्रीकांत महाजन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.