Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली CMEGP

हिंगोली जिल्ह्याची CMEGP मध्ये विक्रमी कामगिरी: 149.67% उद्दिष्टपूर्ती

Hingoli CMEGP: हिंगोली जिल्ह्यात CMEGP योजनेअंतर्गत विक्रमी 149.67% उद्दिष्टपूर्ती; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी अंमलबजावणी


हिंगोली जिल्ह्याची cmegp मध्ये विक्रमी कामगिरी 14967 उद्दिष्टपूर्ती

Hingoli CMEGP |

हिंगोली (Hingoli CMEGP) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत हिंगोली जिल्ह्याने सन 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त  दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी श्री. राहुल गुप्ता यांना पाठवलेल्या अभिनंदन पत्रातून ही बाब समोर आली आहे.

हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टाच्या 149.67% पूर्तता करून राज्यात आघाडी घेतली आहे. युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे व स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2019 पासून राज्यात कार्यान्वित आहे.

विकास आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे की, ही यशस्वी उद्दिष्टपूर्ती जिल्हाधिकाऱ्यांचे सक्षम नेतृत्व, यंत्रणेमधील प्रभावी समन्वय आणि कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळेच शक्य झाली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी (Hingoli CMEGP) हिंगोली जिल्ह्याला CMEGP अंतर्गत एकूण 1000 प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली येत्या वर्षातही योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन अधिकाधिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही विकास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीमुळे स्थानिक तरुणांमध्ये उद्योजकतेबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related to this topic: