Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत वानर हैदोस

वसमतमध्ये वानरांचा हैदोस, वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून तीन वानरांना केली जेरबंद

Vasmat Monkey Rampage: वसमत शहरात माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाटील नगरसह वसमत शहरातील विविध भागांमध्ये माकडांनी नागरिकांवर हल्ले


वसमतमध्ये वानरांचा हैदोस वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून तीन वानरांना केली जेरबंद

Vasmat Monkey Rampage |

हिंगोली (Vasmat Monkey Rampage) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाटील नगरसह वसमत शहरातील विविध भागांमध्ये माकडांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, माकडांच्या टोळीने घरांच्या छतावरून, विजेच्या तारा आणि झाडांवरून धुमाकूळ घातला. यामध्ये काही महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिकांना माकडांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता आणि त्यांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.

नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने शहरातील संवेदनशील भागांमध्ये जाळी, पिंजरे आणि इतर साधनांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वन कर्मचाऱ्यांना तीन उपद्रवी वानरांना जेरबंद (Vasmat Monkey Rampage) करण्यात यश आले. पकडण्यात आलेल्या वानरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
 
"गेल्या चार दिवसांपासून आम्ही घराबाहेर पडायलाही घाबरत होतो. माकडे घरात घुसून सामान फेकत होती आणि लहान मुलांवरही हल्ला करत होती. वन विभागाने वेळीच कारवाई करून माकडांना पकडले, त्यामुळे आता आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आहे."

वन विभागाच्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र शहरात अजूनही काही माकडे असल्याची शक्यता असल्याने वन विभागाने गस्त वाढवली आहे. नागरिकांनीही अन्न उघड्यावर ठेवू नये आणि माकडांना खाद्य पदार्थ देऊ नये, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील काही दिवस वन विभागाचे पथक शहरात लक्ष ठेवून राहणार आहे.