Warehouse Turmeric Theft: हिंगोली ग्रामीण पोलीसने एमआयडीसीच्या लिंबाळा वेअरहाऊसमधील १९ लाख ९९ हजार ८०० रुपयांची हळद चोरीसाठी गुन्हा दाखल केला. ३५३ कट्टे हळद चोरीला गेले असून चोर
हिंगोली (Warehouse Turmeric Theft) : शहरा जवळील लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीमध्ये वेअरहाऊस मध्ये ठेवण्यात आलेल्या १९ लाख ९९ हजार ८०० रुपये किमतीचे ३५३ हळदीचे कट्टे चोरीला गेल्याचे उघड झाल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी लिंबाळा येथील स्टार अग्रोवेअर हाऊसिंग अँड कॉलॅटरल मॅनेजमेंट ली. कंपनीच्या वेअर हाऊसमधून तब्बल १९ लाख ९९ हजार ८०० रुपये किमतीची (Warehouse Turmeric Theft) हळद अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे व्यवस्थापक किरण उत्तमराव कवडे रा. कन्हेरवाडी, जि. धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ मे रोजी सकाळी १० वाजेपासून ते २३ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान लिंबाळा एमआयडीसी तील मक्ता दक्षिणेस ०६ किमी बिट क्र. ०१ येथील कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये ठेवलेली हळद चोरीला गेली आहे. फिर्यादीनुसार, वेअर हाऊसचे शटर वाकवून व उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि एकूण ३५३ कट्टे हळद चोरून नेली. चोरीला गेलेल्या हळदीचे वजन १८१.८० क्विंटल असून, ११ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने एकूण १९ लाख ९९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या (Warehouse Turmeric Theft) घटनेची नोंद ७ जून रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल जि. घुले करत आहेत. पोलीस निरीक्षक घुले, पोलिस उपनिरीक्षक आर.जी. घुले व सुधीर ढेंबरे यांचे पथक घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहे.