Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम

हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

Hingoli SIR Mission: भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (ESAR) प्रक्रियेचे काम सुरू होते. जिल्हातील एकूण ९ लाख ६१ हजार ३४५ मतदार


हिंगोली जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

Hingoli SIR Mission |

 

९.६१ लाख मतदारांची घर पडताळणी होणार

हिंगोली (Hingoli SIR Mission) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात मतदार यादीची विशेष सखोल पुनरिक्षण (एस आय आर) मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली १९ जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक उप जिल्हाधिकारी चौंडेकर, जिल्हा माहिती अधिकारी बारहाते यांची उपस्थिती होती.

हिंगोली जिल्ह्यात एकूण ९ लाख ६१ हजार ३४५ मतदारांची घर-टू-घर पडताळणी केली जाणार आहे. यासाठी १०१५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना पूर्व-भरलेला गणना प्रपत्र  देतील. (Hingoli SIR Mission) मतदारांनी त्यातील माहिती तपासून, स्वाक्षरी करून एक प्रत बीएलओकडे जमा करायची आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र व्यक्तींची नावे वगळणे हे आहे. २००२- २००८ दरम्यान झालेल्या शेवटच्या सखोल पुनरिक्षणानंतर प्रथमच अशी मोहीम राबवली जात आहे. मतदाराचे नाव, वय, पत्ता यासोबतच नवीन छायाचित्रदेखील घेतले जाणार आहे.

महाराष्ट्रात ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान पूर्ण होणार आहे. अर्हता दिनांक १ जुलै २०२६ असून १ जानेवारी २००८ पूर्वी जन्मलेल्या व १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची नावे यादीत नोंदवली जातील. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. जिल्ह्यातील ९२-वसमत, ९३-कळमनुरी आणि ९४-हिंगोली या तीनही विधानसभा मतदारसंघांत मिळून १०१५ मतदान केंद्रे आहेत. मॅपिंगदरम्यान ९२.५५ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. नागरिकांनी  आपली माहिती आधीच तपासून ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गृहभेटीदरम्यान घर बंद  आढळल्यास केंद्रस्तरीय अधिकारी किमान तीन वेळा संबंधीत घरांना भेट दिल्याची योग्य नोंद ठेवण्यात येईल. योग्यरितीने भरलेल्या  व सही केलेले गणना प्रपत्र  गोळा करण्यासाठी बिएलओ पुन्हा संबंधीत मतदाराच्या  घरी भेटी देतील. ५ ऑगस्ट रोजी प्रारुप याद्या प्रसिध्द येतील.

त्यानंतर ज्या मतदाराचे नावे पुर्वीच्या यादीत नोंदीशी जुळवणी झाली नसली किंवा त्यांच्या (Hingoli SIR Mission) जुळवणीमध्ये काही त्रुटी असतील अशा  व्यक्तीना मतदान   नोंदणी  अधिकार्‍यामार्फत नोटीसा पाठविण्यात येतील. तसेच अशा व्यक्तीच्या  नावाची यादी त्यांचे नाव समाविष्ट न झाल्याच्या  संभावित कारणासह संबंधीत  मतदार संघातील स्थानिक स्वराज्य  संस्था, कार्यालय तसेच तहसीलदार  कार्यालय आदी ठिकाणी प्रसिध्द  करण्यात येणार  आहे. तसेच जिल्हा  निवडणुक अधिकारी व मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या  संकेत स्थळावर सुध्दा अशा याद्या प्रसिध्द  करण्यात येतील.

हिंगोली जिल्हा मॅपींगचा तपशील
वसमत विधानसभा एकूण मतदार संख्या ३ लाख १७ हजार  ९७९, एकूण मॅपींग झालेले मतदार २ लाख ९० हजार ३१८, मॅपींग न झालेले मतदार २७ हजार ६६१, मॅपींग मतदारांची टक्केवारी ९१.३०, विसंगती असलेले मतदार ५० हजार २३१.
कळमनुरी विधानसभा एकूण मतदार संख्या ३ लाख २४ हजार  ५७२, एकूण मॅपींग झालेले मतदार ३ लाख ४ हजार १५०, मॅपींग न झालेले मतदार २० हजार ४२२, मॅपींग मतदारांची टक्केवारी ९३.७१, विसंगती असलेले मतदार ५४ हजार ५९४.

हिंगोली विधानसभा एकूण मतदार संख्या ३ लाख २६हजार  ८३४, एकूण मॅपींग झालेले मतदार ३ लाख २ हजार ७०९, मॅपींग न झालेले मतदार २४ हजार १२५, मॅपींग मतदारांची टक्केवारी ९२.६२, विसंगती असलेले मतदार ५४ हजार ४९३.
एकूण मतदार संख्या ९ लाख ६९हजार  ३८५, एकूण मॅपींग झालेले मतदार ८ लाख ९७ हजार १७७, मॅपींग न झालेले मतदार ७२ हजार २०८, मॅपींग मतदारांची टक्केवारी ९२.५५, विसंगती असलेले १ लाख्रा ५९ हजार  ३१८

हिंगोली जिल्ह्यातील मतदाराचा तपशील
वसमत विधानसभा एकूण मतदान संख्या ३२७, केंद्रस्तरीय अधिकारी ३२७,  मतदार पुरुष १ लाख  ६२ हजार ९१६, स्त्री १ लाख ५५ हजार ५७, तृतीय पंथी ६ एकूण ३ लाख १७ हजार ९७९
कळमनुरी विधानसभा एकूण मतदान संख्या ३४५, केंद्रस्तरीय अधिकारी ३४५,  मतदार पुरुष १ लाख  ६८ हजार २३८, स्त्री १ लाख ५६ हजार ३३०, तृतीय पंथी ६ एकूण ३ लाख २४ हजार ५७२
हिंगोली विधानसभा एकूण मतदान संख्या ३४३, केंद्रस्तरीय अधिकारी ३४३,  मतदार पुरुष १ लाख  ६९ हजार ५४५, स्त्री १ लाख ५७ हजार २८५, तृतीय पंथी ४ एकूण ३ लाख २६ हजार ८३४

एकूण मतदान संख्या १ हजार १५, केंद्रस्तरीय अधिकारी १ हजार १५, मतदार पुरुष ५ लाख  ६९९ , स्त्री ४ लाख ६८ हजार६७२ , तृतीय पंथी १४ एकूण ९ लाख ६९ हजार ३८५
नाव नोंदणीसाठी जन्माचा दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जमिनीचा दस्तऐवज यांसह १२ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. आधार कार्डही ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल. कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही' या ब्रीदवाक्यासह ही मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मतदारांनी बी एलओला ला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Related to this topic: