Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत विना क्रमांकाच्या वाहनांवर धडक कारवाई

शहरासह परिसरात अनेक विना क्रमांकाचे वाहने चालविली जातात.


हिंगोलीत विना क्रमांकाच्या वाहनांवर धडक कारवाई

Hingoli Traffic |

हिंगोली शहर वाहतुक शाखेची जोरदार मोहीम 

हिंगोली (Hingoli Traffic) : शहरासह परिसरात अनेक विना क्रमांकाचे वाहने चालविली जातात. एखाद्या वेळी अपघाताची घटना घडल्यास संबंधित वाहनांवर कारवाई करण्या करीता अडचण निर्माण होते. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्या करीता अडसर ठरत असल्याने हिंगोलीत शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाई करण्या करीता धडक मोहीम सुरू केली आहे. 

विना क्रमांकामुळे दंडात्मक कारवाईसाठी अडसर

प्रत्येक वाहनांच्या नंबर प्लेटवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेला वाहन क्रमांक टाकणे बंधनकारक आहे. परंतु अनेक वाहनचालक दंडात्मक कारवाई टाळण्या करीता तसेच एखाद्यावेळी अपघाताची घटना घडल्यास संबंधित वाहनांवर कारवाई होऊ नये, या उद्देशाने नंबर टाकत नसल्याचे उघड झाले आहेत. बर्‍याच वाहनांवर नंबर नसल्याने पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्या करीता तसेच एखाद्या वेळी अपघाताची घटना घडल्यास गुन्हा दाखल करण्या करीता अडचण निर्माण होते.  त्यामुळे हिंगोली शहर व परिसरात विना क्रमांकाच्या वाहनावर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू झाली आहे. यासाठी शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्यासह पोउपनि रावसाहेब घुमनर, गजानन राठोड, संतोष घुगे, सुखदेव जाधव, नंदकिशोर महाजन, विद्या भुजबळे, शिल्पा फटाले, कपिल जाधव, शशिकांत भिसे आदी कर्मचारी या मोहीमेत सहभागी आहेत. 

वाहनांवर नंबर टाकुन घ्यावेत -पोलीस निरीक्षक शरद मरे

प्रत्येक वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेला नंबर टाकणे बंधनकारक आहे. अनेक वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नंबर क्रमांक टाकला नसल्याने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्या करीता अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकांनी वाहनांवर नंबर टाकावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांनी दिला आहे.

Related to this topic: