Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

स्वयंचलित वाहन तपासणी

हिंगोलीत लवकरच स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू होणार

Automated vehicle inspection: संगणक व सेंसरद्वारे स्वयंचलित वाहनांचे 18 प्रकारची तपासणी करण्याचा केंद्र सुरू होत असलेला हिंगोलीत. १५ ते २० मिनिटांत फिटनेस प्रमाणपत्र मिळेल.


हिंगोलीत लवकरच स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू होणार

Automated vehicle inspection |

हिंगोली (Automated vehicle inspection) : हिंगोलीकरांसाठी लवकरच स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू होणार आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी आज आरटीओ कार्यालयालगत उभारण्यात आलेल्या केंद्राची पाहणी केली. 

या केंद्रात वाहनांच्या फिटनेसची तपासणी संपूर्णपणे संगणकीय प्रणाली व सेन्सरद्वारे केली जाणार आहे. ब्रेक, हेडलाईट, साइड स्लिप, सस्पेंशन, प्रदूषण पातळी यासह सुमारे 18 प्रकारच्या तांत्रिक चाचण्या कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहेत. चाचणीचा अहवाल थेट संगणकावर तयार होईल व पात्र वाहनांना तात्काळ फिटनेस प्रमाणपत्र मिळेल.  सध्या वाहनधारकांना फिटनेससाठी मॅन्युअल तपासणीवर अवलंबून राहावे लागते. नवीन केंद्रामुळे (Automated vehicle inspection) ही प्रक्रिया पारदर्शक व वेगवान होणार असून एका वाहनाची तपासणी 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल. 

केंद्र शासनाच्या नियमानुसार 15 वर्षांवरील व्यावसायिक व 20 वर्षांवरील खासगी वाहनांची फिटनेस चाचणी आता फक्त स्वयंचलित केंद्रातच होणार आहे. हिंगोलीतील केंद्राचे बांधकाम व मशिनरी बसवण्याचे काम पूर्ण झाले असून अंतिम चाचण्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांत हे केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी दिली.