Rasta Roko Movement: ध्वजारोहणानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवित काढता पाय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविला.
हिंगोली (Rasta Roko Movement) : ध्वजारोहणानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवित काढता पाय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविला.
दरवर्षी परंपरेप्रमाणे ध्वजारोहणानंतर पालकमंत्री विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मार्गी लावत असतात. थेट पालकमंत्रीच उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत असल्यामुळे नागरिकांच्या विविध मागण्या मागणी मार्गी लागतात. या आशेमुळे प्रशासनाचे उंबरठे झिजवलेले अनेक जण ध्वजारोहणाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतात.

यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर देखील हे शेतकरी पालकमंत्र्यांचा ताफा अडविण्याचे तयारीत असताना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेत आपला दौरा आटोपला. परिणामी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांची कोणीच दखल घेतली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेना, दिव्यांग आधार संघटना यांच्यासह समाजातील विविध घटक व नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. परंतु पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्यामुळे 17 ऑगस्ट सोमवार रोजी संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर ही आंदोलन करीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते कळमनुरी विनोद बांगर. लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष संदेश शिखरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय डाखोरे, लहुजी शक्ती सेना कोर कमिटी जिल्हाध्यक्ष सुशील कसबे, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ रणबावळे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास खंदारे, दशरथ खंदारे, अण्णाभाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नामदेव मानमोठे, अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला जिल्हाध्यक्ष मंदाकिनीताई चव्हाण, वंदनाताई भालेराव, सुनीताताई कर्डिले, लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष संतोष घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते राजू सुतार, लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष सेनगाव प्रकाश सुतार, नारायण कर्डिले, पंडित भालेराव, लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष कळमनुरी, सागर इंगळे, कळमनुरी शहर उपाध्यक्ष अनिल लांडगे, चांदु इंगोले, रवी सुतारे, राज रणखांबे, सुरेश घडाळे, लहुजी शक्ती सेना कळमनुरी तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मारुती शिखरे, लहुजी शक्ती सेना हिंगोली तालुका अध्यक्ष अनिल डोके. अविनाश गायकवाड. नागेश सूर्यवंशी. पंढरीनाथ शिखरे. प्रमोद शिखरे. पवन शिखरे. ज्ञानेश्वर शिखरे रास्तारोको मध्ये सहभागी झाले यावेळी मातंग समाजातील नेते कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.