Hingoli Police Force: हिंगोली जिल्हा पोलीस दलात ३६ पोलीस अधिकारींना १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना प्रशासकीय निकडी, वैद्यकीय कारण, मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्तीच्या शिल्लक
हिंगोली (Hingoli Police Force) : जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय कारणास्तव पात्र असलेल्या 36 पोलीस अंमलदारांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी काढले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2015 नुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने 22 मे 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हे आदेश 28 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. वैद्यकीय कारण, वैयक्तिक अडचणी तसेच प्रशासकीय निकडीमुळे या पोलीस अंमलदारांना सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणीच 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळालेले पोलीस अंमलदार व त्यांचे नेमणुकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे :
सपोउपनि रस्तुम सिताराम काळे, पोहेकॉ उमाकांत दत्तराव गायकवाड, सपोउपनि शामराव प्रकाशराव खुळे, सपोउपनि गोरखनाथ दत्तराव खोखले, पोहेकॉ गणेश उत्तमराव राठोड, सपोउपनि प्रकाश राजाराम शिंदे यांना पोलीस मुख्यालय हिंगोली येथेच मुदतवाढ देण्यात आली आहे. सपोउपनि सुभाष श्यामराव बेडगे यांना पोलीस ठाणे वसमत शहर, पोहेकॉ शिवाजी विठ्ठल पारस्कर यांना शवागृह हिंगोली येथे मुदतवाढ मिळाली आहे.
पोहेकॉ अंबादास अंजीला ठाकरे, पोहेकॉ गणेश पांडुरंग पवार, पोहेकॉ शंकर संभाजी कऱ्हाळे, पोहेकॉ संग्राम गंगाधर कदम, पोहेकॉ पांडुरंग नामदेव दळवे, पोशि रामेश्वर दत्तात्रय दुबे यांना पोलीस मुख्यालय हिंगोली येथेच ठेवण्यात आले आहे. सपोउपनि विश्वनाथ गोविंदराव खंदारे यांना पोलीस ठाणे वसमत ग्रामीण, पोहेकॉ दिगांबर अशोक मस्के यांना पोलीस ठाणे कळमनुरी येथे मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोहेकॉ केशव निवृत्ती पुंड, पोहेकॉ रोडगे गंगाराम किशनराव, पोशि भागाजी गोपाळराव कऱ्हाळे, मपोशि स्वाती सखाराम पिंपरे यांना पोलीस ठाणे हिंगोली शहर येथे 1 वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. पोशि इरफानखान समीउल्लाखान पठाण यांना सायबर सेल हिंगोली, पोशि अमोल झबू चव्हाण यांना पोलीस ठाणे औंढा ना., पोशि साहेबराव आनंदराव चव्हाण यांना पोलीस ठाणे वसमत ग्रामीण येथे मुदतवाढ दिली आहे.
पोशि किरण बालाजी घोत्रे यांना पोलीस ठाणे हत्ता, पोशि भास्कर गंगाधर माने यांना पोलिस कक्ष हिंगोली, पोशि योगेश कैलास होडगीर यांना पोलीस ठाणे हिंगोली ग्रामीण येथे मुदतवाढ देण्यात आली आहे. पोशि ज्ञानेश्वर दत्तराव पायघन यांना स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, मपोना पौर्णिमा रमेश वाघमारे, मपोहेकॉ विटाबा मल्लमा हिराळी, मपोशि कल्पना बन्सी अनपट, मपोशि सविता विजय कांबळे, मपोशि विजया संतोष डांगरे यांना पोलीस मुख्यालय हिंगोली येथेच ठेवण्यात आले आहे.
मपोशि दिपाली संजू इंगोले यांना पोलीस ठाणे सेनगाव, मपोशि वंदना भाऊराव सारंग, मपोशि मीना राजकुमार पुंडगे यांना पोलीस ठाणे नरसी ना., मपोशि शिल्पा सुदामराव लोणे यांना पोलीस ठाणे बाळापूर येथे मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व अंमलदारांना वैद्यकीय कारण, प्रशासकीय निकड, मुलांचे शिक्षण, विनंती अर्ज, सेवानिवृत्तीस कमी कालावधी शिल्लक असल्याने 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिल्या आहेत.