Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अनैतिक व्यापार प्रकरण

अनैतिक व्यापार प्रकरणाचा पर्दाफाश; एका महिलेवर गुन्हा दाखल

Unethical trading case: हिंगोलीत सायंकाळी, एक ४९ वर्षीय महिला जे शिवारातील लिंबाळा मक्ता राहत असे, अनैतिक व्यापारी कक्झाच्या पोलिस छाप्यातून निष्कर्षण झाले. त्याने गोपनीयपणाची माहिती


अनैतिक व्यापार प्रकरणाचा पर्दाफाश एका महिलेवर गुन्हा दाखल

Unethical trading case |

 

संतुक पिंपरी व लिंबाळा मक्ता शिवारातील घटना 
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून मारला छापा

हिंगोली (Unethical trading case) : हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कारवाई करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला आहे. शनिवार 13 जून रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 49 वर्षीय महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता  जगताप (गोमासे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील रहिवासी असलेली 49 वर्षीय महिला सध्या हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी व लिंबाळा मक्ता शिवारात राहते. 

 13 जून सायंकाळच्या सुमारास संतुक पिंपरी व लिंबाळा मक्ता शिवारातील टिनपत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. 49 वर्षीय आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील मुली व महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. 

या (Unethical trading case) छाप्यात महिला पंचासमक्ष आरोपीकडून एकूण 2400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले.   एक विमल पान मसाला नाव असलेल्या कापडी पिशवीत भरून ठेवलेले निरोध पाकिटही जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात या गुन्ह्यात 2400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री 49 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा पोउपनि मेथेकर यांनी नोंदवला असून तपास पोलीस निरीक्षक व्ही.टी. गुट्टे हे करत आहेत. आरोपी महिलेला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. हि कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप (गोमासे), पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, आर. पी. साळवे, नंदा घोंगडे, गणेश सोनटक्के, नंदू जाधव, सुधीर ढेंबरे, असलम गारवे, वैजनाथ पवार, सलीम पठाण, महिला पोलीस कर्मचारी निर्मला गायकवाड, रवीना घुमनर,चालक नागरगोजे यांनी सहभाग नोंदवला.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहत मध्ये अशाच प्रकारे चालणाऱ्या अनैतिक देह व्यापारावर याच (Unethical trading case) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई केली होती.

Related to this topic: