Hingoli Police Officer: सपोनि उमाकांत पुणे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकार्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत
हिंगोली (Hingoli Police Officer) : जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकार्यांचा खांदेपालट झाला आहे. ज्यामध्ये वसमत ग्रामीण ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे यांच्या जागेवर कळमनुरी ठाण्यातील सपोनि उमाकांत पुणे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकार्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे आहेत. तत्कालिन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हातंर्गत अनेक पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. कालांतराने त्यांची नांदेड येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेले पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी पदभार स्विकारल्या नंतर जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. काही पोलिस ठाणे हद्दिमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होणारे प्रश्न आदींची माहिती घेतली जात होती.
९ ऑगस्टला (Hingoli Police Officer) दोन पोलिस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले. ज्यामध्ये वसमत ग्रामीण ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे यांना पोलिस नियंत्रण कक्ष हिंगोली तर त्यांच्या रिक्त जागेवर कळमनुरीचे सपोनि उमाकांत वैजनाथ पुणे यांची नियुक्ती केली. पोलिस अधिक्षकांच्या रडावरवर आणखी काही पोलिस अधिकारी असल्याने लवकरच त्यांचाही खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.