Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलीस दल

हिंगोली पोलीस दलाचा कौतुकास्पद पुढाकार; ६५ जवानांच्या विश्रांतीसाठी सुसज्ज पलंग तयार

Hingoli Police Force: हिंगोली जिल्हा पोलीस दलाने ६५ नवनियुक्त पोलिस युवकांना प्रशिक्षणपूर्व विश्रांतीसाठी विशेष पलंग तयार करण्याचा कौतुकास्पद पाऊल उचलला आहे.


हिंगोली पोलीस दलाचा कौतुकास्पद पुढाकार ६५ जवानांच्या विश्रांतीसाठी सुसज्ज पलंग तयार

Hingoli Police Force |

​हिंगोली (Hingoli Police Force) : हीच जिद्द आणि कष्टाच्या जोरावर हिंगोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या ६५ नवनियुक्त युवकांसाठी जिल्हा पोलीस दलाने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या या सर्व भावी पोलिसांच्या राहण्याची उत्तम सोय पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे. लवकरच या जवानांचा खडतर प्रशिक्षण काळ (ट्रेनिंग पिरेड) सुरू होत आहे. दिवसभराच्या कठोर प्रशिक्षणानंतर या जवानांना रात्री उत्तम विश्रांती मिळावी, या उद्देशातून प्रशासनाने त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. ६५ जवानांना झोपण्यासाठी नवीन आरामदायी पलंग तयार करून घेतले जात आहेत.

​प्रशिक्षण काळातील सोयींवर भर अधिक भर दिला जात आहे. कारागिरांकडून काम युद्धपातळीवर सुरू

पोलीस दलात (Hingoli Police Force) दाखल होणाऱ्या या नव्या दमाच्या शिपायांचे स्वागत करण्यासाठी पोलीस मुख्यालय सज्ज झाले आहे. सध्या मुख्यालयाच्या आवारात स्थानिक कारागिरांकडून हे पलंग तयार करण्याचे काम अत्यंत वेगाने व युद्धपातळीवर सुरू आहे. कठोर मेहनतीनंतर वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेल्या या युवकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन विशेष काळजी घेत आहे. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील आणि नियोजनबद्ध भूमिकेमुळे नवनियुक्त जवान आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Related to this topic: