Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

​११२ हेल्पलाइन क्रमांक

​११२ हेल्पलाइनची तत्परता: पोलीस अंमलदार शरद नागुलकर यांच्या मध्यस्थीमुळे शेतीचा वाद टळला

112 Helpline Number: हिंगोली येथील एका शेतीच्या वादात ११२ हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांचे तत्परता समाधान करून वाद टळला.


​११२ हेल्पलाइनची तत्परता पोलीस अंमलदार शरद नागुलकर यांच्या मध्यस्थीमुळे शेतीचा वाद टळला

112 Helpline Number |


हिंगोली (112 Helpline Number) : स्थानिक ११२ आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या एका कॉलची तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा वाद टळल्याची सकारात्मक घटना समोर आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या कारणावरून उद्भवलेल्या एका वादाप्रकरणी संबंधित नागरिकाने तात्काळ '११२' या आपत्कालीन क्रमांकावर (112 Helpline Number) संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली होती. कॉलची गांभीर्याने दखल घेत, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  विष्णुकांत गुट्टे  यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शरद दत्तराव नागुलकर व बीट जमादार बापू चव्हाण यांनी कसलाही विलंब न लावता थेट घटनास्थळावर धाव घेतली.

​घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस अंमलदार नागुलकर यांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या आणि अत्यंत समजूतदारपणे मध्यस्थी केली. त्यांनी कॉलर आणि उपस्थित इतर लोकांचे कायदेशीर व सामोपचाराने समाधान केले. पोलिसांच्या या योग्य आणि वेळेवर केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतीच्या कारणावरून होणारा संभाव्य मोठा वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न जागीच निकाली निघाला. पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठा होणारा वाद यामुळे कळला यामुळे पोलिसांचे माळहिवरा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.