Hingoli Police: जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली आणि त्यानंतरपासून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळण्यासाठी आतापर्यंत १९ पोलीस अधीक्षकांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला
सुधीर गोगटे
हिंगोली (Hingoli Police) : जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली आणि त्यानंतरपासून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळण्यासाठी आतापर्यंत १९ पोलीस अधीक्षकांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. यामध्ये तत्कालिन जिल्हा पोलिस अधिक्षक सुधीर दाभाडे यांचा जिल्ह्यातील सर्वाधिक काळ तर प्रभारी वगळता पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांचा सर्वात अल्पकाळ जिल्ह्यात होता अशी नोंद आहे.
जिल्हा निर्मितीच्या वेळी पहिले पोलीस अधीक्षक म्हणून धनंजय कमलाकर भापसे यांनी १ मे १९९९ रोजी पदभार स्वीकारला आणि २१ डिसेंबर २००० पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर कुमार शिंदे यांनी २१ डिसेंबर २००० ते २२ जून २००२ या कालावधीत जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली. ह.रा. जाधव २५ जून २००२ ते ३१ डिसेंबर २००४ पर्यंत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर प्रभारी पोलिस अधिक्षक म्हणुन के.एल. मरवाळीकर यांचा कार्यकाळ तुलनेत अत्यंत अल्प म्हणजे १ जानेवारी २००५ ते ५ एप्रिल २००५ असा होता. ५ एप्रिल २००५ रोजी सतीश खंडारे यांनी पदभार घेतला. त्यानंतर प्रतापसिंह पाटणकर २२ जून २००७ ते २ जून २००९, के.जी. पाटील १८ जून २००९ ते ३१ मे २०११ आणि आर.यु. जाधव १ जून २०११ ते ३१ मे २०११ या कालावधीत या पदावर होते.
१ जून २०११ ते ५ जून २०१४ पर्यंत सुधीर दाभाडे यांनी जिल्ह्याचा कारभार पाहिला. त्यानंतर एन. अंबिका ५ जून २०१४ ते १८ एप्रिल २०१५, कैलास कणसे २२ मे २०१९ ते १७ मे २०१६ असा कार्यकाळ राहीला आहे. १३ जून २०१६ ते २ मे २०१७ या काळात अशोक मोराळे, १० मे २०२७ ते ३० जुलै २०१८ या काळात अरविंद चावरिया आणि ३० जुलै २०१८ ते २५ सप्टेंबर २०२० या काळात योगेश कुमार यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर राकेश कलासागर २५ सप्टेंबर २०२० ते २६ ऑक्टोबर २०२२, जी. श्रीधर २६ ऑक्टोबर २०२२ ते ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कार्यरत होते. (Hingoli Police) १४ ऑगस्ट २०२४ २३ डिसेंबर २०२५ या कार्यकाळात श्रीकृष्ण कोकाटे हे या पदावर होते. त्यानंतर डॉक्टर निलाभ रोहन यांनी २३ डिसेंबर २०२५ ते २४ जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली. सध्या डॉ. श्रेणिक लोढा यांनी २४ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि ते सध्या या पदावर कार्यरत आहेत. अशा प्रकारे जिल्हा निर्मितीपासून आजतागायत १९ पोलीस अधीक्षकांनी हिंगोली जिल्ह्याला आपली सेवा दिली आहे.
पोलिस अधिक्षक सुधीर दाभाडे यांचा सर्वाधिक जिल्ह्यात कार्यकाळ
पोलिस अधिक्षक सुधीर दाभाडे यांनी सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण केला. त्यांनी १ ऑगस्ट २०११ रोजी पदभार स्विकारल्यानंतर ४ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बदली झाली होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक सुधीर दाभाडे यांनी पोलिस व नागरीकांत सुसंवाद साधण्याकरीता अनेक उपक्रम राबविले. तसेच पोलिस दलातर्फे घेण्यात येणार्या अनेक क्रीडा स्पर्धाही उल्लेखनीय ठरल्या आहेत. सुधीर दाभाडे यांनी जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, ज्या ज्या ठिकाणी मुलगी जन्माला आली त्या ठिकाणी मातेचा साडी चोळी देऊन गौरव करून मिठाईचे वाटप हा उपक्रम तर राज्यभर गाजला. तसेच (Hingoli Police) स्त्रीभृण हत्या टाळण्याकरीता लेक वाचवा अभियान ही त्यांनी राबविले. गावोगावी ग्राम सुरक्षा दल स्थापन केले. तसेच जातीय सलोखा व भाईचारा राखण्याकरीता त्यांनी मोलाच कार्य केले. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक सुधीर दाभाडे यांचा जिल्ह्यात ३ वर्ष ३ दिवस सर्वाधिक कार्यकाळ राहीला आहे. या सोबतच जिल्हा निर्मितीपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली शहर या पदावरही कार्य केले. जून १९९३ ते जून १९९६ या कालावधीमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले. म्हणजेच सुधीर दाभाडेंचा जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक कार्यकाळ ठरला आहे.
जिल्ह्याला लाभले २ प्रभारी पोलिस अधिक्षक
जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याला दोन प्रभारी पोलिस अधिक्षक म्हणुन लाभले. ज्यामध्ये (Hingoli Police) पोलिस अधिक्षक के.एल. मरवाळीकर यांनी १ जानेवारी २००५ ते ५ एप्रिल २००५ पर्यंत काम पाहीले. त्यांचा कार्यकाळ ३ महिने ४ दिवसाचा होता. त्यानंतर हरीलाल जाधव हे १ जून २०११ रोजी रुजू झाले तर ३१ जुलै २०११ रोजी त्यांची बदली झाली. त्यांचा जिल्ह्यात २ महिन्यांचा कार्यकाळ ठरला.
पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांचा अल्पकाळ
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण हे २३ डिसेंबर २०२५ रोजी रुजू झाले. २४ जून २०२६ रोजी त्यांची बदली झाली. जिल्ह्यात त्यांचा केवळ ६ महिने १ दिवस अल्पकाळ ठरला आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा बिमोड व अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यात करीता प्रयत्न केले.