Co-operative Housing Society: पत्रकारांसाठी स्वतःच्या ठिकाणी घर बांधण्यासाठी जमीन मिळविण्याची मागणी हिंगोलीच्या पाच तालुक्यांतून करत असलेल्या पत्रकारांच्या संघातील नेत्यांनी झाली.
हिंगोली (Co-operative Housing Society) : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली सह वसमत, सेनगाव, औंढा (नागनाथ) आणि कळमनुरी या पाच तालुक्यांतील पत्रकारांनी एकत्र येत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेसाठी शासकीय किंवा गायरान जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
प्राप्त निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण व शहरी भागात अहोरात्र पत्रकारिता करणाऱ्या अनेक पत्रकार बांधवांकडे तालुक्याच्या ठिकाणी स्वतःचे हक्काचे निवासस्थान नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांना घरांची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस फोटोग्राफर्स तसेच अधिकृत सोशल मीडिया पत्रकारांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचे ठरवले आहे.
संस्था प्रत्यक्षात येण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जमीन उपलब्धतेचे 'ना हरकत प्रमाणपत्र' किंवा सकारात्मक पत्र मिळणे आवश्यक आहे. (Co-operative Housing Society) निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. हिंगोली, वसमत, सेनगाव, औंढा (ना.) आणि कळमनुरी या तालुक्यांच्या ठिकाणी पत्रकारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी योग्य शासकीय किंवा गायरान जमीन द्यावी. जमीन उपलब्धतेबाबत प्रशासकीय मंजुरीचे पत्र द्यावे जेणेकरून संस्था रीतसर अस्तित्वात येईल. तसेच अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या पत्रकारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आहे.
"लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला आणि त्यांच्या कुटुंबाला हक्काचे छप्पर मिळवून देण्यासाठी तात्काळ तालुका महसूल प्रशासनाला निर्देशित करून नियम व अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून जमीन उपलब्ध करून देण्याबाबत पत्र द्यावे," अशी विनंती अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. या निवेदनावर वसमत, सेनगाव, औंढा (ना.) आणि कळमनुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक निर्णयाची प्रतीक्षा व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विजय दगडू, प्रद्युम्न गिरीकर नंदकिशोर तोष्णीवाल, वसंत कुमार भट्ट , शिवाजी मेटकर ,अँड. चंद्रकांत देवणे, प्रभाकर स्वामी, कन्हैया खंडेलवाल, उमेश चक्कर, विजय खंदारे, तुकाराम झाडे, विलास काचगुंडे , फारुकी अजमत काझी , अफजल शरीफ, दिलीप खोडके, मुजीब पठाण, मोहम्मद रफीक, गोपाल काकडे, संजय शितळे, शफी डोंगरगावकर, शारेकजा, शेख साजिद, अलीमुद्दीन कादरी, विठ्ठल कदम, प्रवीण नायक, मदन बियाणी, सुनील केंद्रे, सुरेश जोशी, अमोल नायक, बबन सुतार, गजानन नाईक, प्रकाश पाटील , विश्वनाथ देशमुख, सुधीर गोगटे, शिवाजी घुगे, बाबाराव अवसे, सय्यद अहमद, डॉक्टर संतोष गावंडे, मझर शेख, शंकर राऊत, वकियोद्धीन सिद्दिकी, प्रभाकर बारशे, रवी कुटे, श्रीकांत बाराहाते, नंदू परदेशी , फिरदोस सिद्दिकी, माजिद सिद्दिकी, योगेश अग्रवाल, डॉक्टर शेख हबीब , श्याम शेवाळकर, प्रदीप पातेकर यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.