Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नमो उद्यान

हिंगोलीत नमो उद्यानाचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

Hingoli Namo Park: गरपालिकेच्या निवडणूक काळात दत्त गल्ली आणि मंगळवारा बाजार परिसरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हिंगोली नगर परिषदेने मोठे पाऊल उचलले


हिंगोलीत नमो उद्यानाचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

Hingoli Namo Park |

 

हिंगोली पालिका निवडणुकीत नागरिकांना दिलेला शब्द पाळला
नगर उद्यान योजनेतून १ कोटींचा खर्च 
ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठी आधुनिक सुविधा

हिंगोली (Hingoli Namo Park) : नगरपालिकेच्या निवडणूक काळात दत्त गल्ली आणि मंगळवारा बाजार परिसरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हिंगोली नगर परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे. येथील पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असलेल्या 'नमो उद्याना'चे भूमिपूजन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नगर उद्यान योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारले जाणार आहे.

मंगळवारा बाजार आणि दत्त गल्ली परिसरातील नागरिकांनी निवडणूक काळात दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. यात मंगळवारा बाजार पुन्हा मूळ जागेत भरवणे आणि पाण्याच्या टाकीखालील जागेत उद्यान विकसित करणे, यांचा समावेश होता. नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी हे आश्वासन पूर्ण केले असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र फिरण्याची आणि बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, तसेच आरोग्यासाठी 'ओपन जिम' यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या (Hingoli Namo Park) भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेना गटनेते नगरसेवक श्रीराम बांगर, सुभाष बांगर, गणेश बांगर, रवींद्र वाढे, खली बांगर, संदीप बांगर, विशाल गोटरे, रामकिसन बांगर, गुड्डू बांगर, नितीन बांगर, धनंजय मेथेकर, मोहनराव शार्दूल, सुधाकरराव रत्नपारखी, नागोराव देशपांडे, श्यामराव इटोलिकर, राजूभाऊ मुंदडा, रवी मुंदडा, कृष्णराव जोशी, स्वप्नील सोनपावले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या नमो उद्यानाचा स्थानिक नागरिकांनी आणि मुलांनी आरोग्यासाठी लाभ घ्यावा," असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी केले.