Hingoli Motorcycle Theft: शहरातील एनटीसी भागात दोन अज्ञात चोरट्यांनी दोन मोटार सायकल चोरून नेल्याने १० ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
हिंगोली (Hingoli Motorcycle Theft) : शहरातील एनटीसी भागात दोन अज्ञात चोरट्यांनी दोन मोटार सायकल चोरून नेल्याने १० ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. हिंगोली शहरातील एनटीसी भागातील कांतिलाल व्दारकालाल जैस्वाल यांची युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एबी ४५५१ व डॉ. माधव मस्के यांची युनिकॉर्न क्रमांक एमएच ३७ एबी ०३१५ अशा दोन्ही मोटार सायकली घराच्या आवारामध्ये उभ्या केल्या होत्या.
१० ऑगस्टला मध्यरात्री ३.३८ वाजता २ अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ८० हजार रुपयाच्या मोटार सायकल चोरून नेल्याने हिंगोली शहर पोलिसात कांतिलाल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या मोटार सायकल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये वैâद झाली असुन चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के हे करीत आहेत.