Hingoli Motor Pump Theft: जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मोटारपंप चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखे..
हिंगोली (Hingoli Motor Pump Theft) : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मोटारपंप चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माधव जिव्हारे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. (Hingoli Motor Pump Theft) घटनास्थळांचा बारकाईने अभ्यास करून व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेवाळा येथील शेख वजीद शेख आयुब, शेख जिलानी शेख रब्बानी आणि संजय उर्फ न्यायपाल हिरामण नरवाडे या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या तिघांनी मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोटारपंप चोरल्याची कबुली दिली.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले हे तीन गुन्हे या (Hingoli Motor Pump Theft) टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीस गेलेले चार मोटारपंप, 800 फूट केबल आणि गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी ऑटो असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि माधव जिव्हारे यांच्यासह भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, मुनीर प्यारेवाले, हरीभाउ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे व शंकर हराळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.