Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विधान परिषद निवडणुक

मतदारांना हवाय ‘गब्बर’ उमेदवार; स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुक

Legislative Council Elections: परभणी-हिंगोली विधानसभा निवडणुकांमध्ये गब्बर उमेदवारीची अपेक्षा असून मतदारांचा उमेदवारी दाखल करण्याच्या तारीखी अंमलात न आल्याने चलबिचलता माहिती


मतदारांना हवाय ‘गब्बर’ उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुक

Legislative Council Elections |

हिंगोली (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत गब्बर उमेदवार असावा, अशी अपेक्षा मतदारांची बनली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख येऊनही याबाबत निर्णय न झाल्याने मतदारच चलबिचल आहेत.

विधान परिषदेच्या परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडीसाठी २५ मे सोमवार पासून उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. निवडणुक अगदी उंबरवठ्यावर येऊन ठेपली असली तरी पक्षस्तरावर जागा वाटपाचा निर्णय अंतीम होत नसल्याने मतदारांमध्ये मोठी चलबिचल आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुती विरूद्ध महाआघाडी अशी लढत झाल्यास महायुतीचा एकतर्फी विजय होऊ शकतो. किंबहुना ही निवडणुक बिनविरोध सुद्धा होऊ शकते, असे झाल्यास मतदारांना मात्र झटका बसणार आहे. जागा वाटप व उमेदवार निश्चित होण्या आधीच माध्यमांमध्ये ‘रेट’ ठरल्याची चर्चा सुरू झाली होती. चर्चेत हेच रेट थेट गगनाला भिडले होते. अशात एकतर्फी िंकवा बिनविरोध निवडणुकीची परिस्थिती आल्यास मतदारांच्या हाती धुपाटणे येण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे जुन्या - जाणत्या नगरसेवकांनी तिसर्‍या उमेदवाराला जागे करण्याचे प्रयत्नही सुरू केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पक्षपातळीवर जागा वाटपाचा निर्णय अद्याप अंतीम झालेला नसला तरी विप्लव बाजोरिया हे शिवसेनेने आपली उमेदवारी निश्चित केली असून एकनाथ शिंदेंनी ‘सिग्नल’ दिल्याचे दाखवित आहेत. जुन्या सूत्रानुसार ही जागा शिवसेनेकडे असल्याने युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राम कदम, राजु चापके यांची आ. संतोष बांगर यांनी भेट घालुन दिली आहे. या दोघांसहीत परभणी जिल्ह्यातील सईद भैय्या हे सुद्धा जोर लावत असल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्ह्यातील काही इच्छुकांनी यासाठी वरिष्ठांची मनधरणी सुरू केली आहे. आ. रत्नाकर गुठ्ठे यांचे नगरसेवक सोबत असल्याचे दाखवून भारतीय जनता पक्ष या जागेवर दावा करीत आहे. पक्षातून उमेदवारीच्या स्पर्धेत माजी मंत्री सुरेश वरपुडकर, परभणीतील कंत्राटदार संतोष मुरकुटे, गंगाधर बोर्डीकर हे सुद्धा प्रयत्नात असल्याचे समजते.
पक्षाच्या चिन्हावर सर्वाधिक मतदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटातर्पेâ या जागेवर दावा करण्यात येत असला तरी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी मोठे नेते दावा करताना दिसत नाहीत. हिंगोली जिल्ह्यातून माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण व परभणीतून माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. ऐन वेळी उमेदवार आयात करून राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुक लढण्याची शक्यताही बोलुन दाखविली जात आहे.

Related to this topic: