Hingoli Loan Waiver Scheme: हिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी १३,९८९ शेतकऱ्यांवर e-KYC प्रक्रिया अडवली आहे. पाच तालुक्यात बँकेत ४०,५६२ खातांचे प्रलंबित राहिले आहेत.
हिंगोली (Hingoli Loan Waiver Scheme) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी e-KYC ची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार हिंगोली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एकूण 13 हजार 989 शेतकऱ्यांची e-KYC अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये e-KYC ची कामे बाकी आहेत. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 229 शेतकरी हे हिंगोली तालुक्यातील आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुक्यात 3 हजार 271, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यात प्रत्येकी 2 हजार 337 तर वसमत तालुक्यात 1 हजार 915 शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
बँकनिहाय माहिती पाहिल्यास स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त 5 हजार 656 प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये हिंगोलीच्या 1 हजार 526 आणि कळमनुरीच्या 1 हजार 442 केसेसचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 3 हजार 52 शेतकऱ्यांची KYC बाकी आहे. (Hingoli Loan Waiver Scheme) सेनगाव तालुक्यात या बँकेच्या 955 तर कळमनुरीत 590 आणि वसमतमध्ये 511 प्रकरणे प्रलंबित आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाट्याला 2 हजार 306 प्रकरणे आली असून त्यापैकी 1 हजार 152 केसेस या एकट्या कळमनुरी तालुक्यातील आहेत.
याशिवाय युनियन बँक ऑफ इंडियात 870, बँक ऑफ बडोदामध्ये 761, बँक ऑफ इंडियात 740, सेंट्रल बँक ऑफ इंडियात 212, परभणी DCCB मध्ये 197, UCO बँकेत 122, इंडियन बँकेत 62 आणि पंजाब नॅशनल बँकेत 10 शेतकऱ्यांची e-KYC प्रलंबित आहे. ICICI बँकेत सध्या कोणतीही केस प्रलंबित नसून DCCB यवतमाळमध्ये केवळ एकच प्रकरण शिल्लक आहे.
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार स्टेट बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे जिल्ह्यातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक प्रलंबित प्रकरणे आहेत. त्यामुळे या दोन बँकांवर e-KYC पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आहे. कळमनुरी तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI मध्ये मिळून अडीच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याने तेथेही गती वाढवणे गरजेचे आहे.
योजनेचा (Hingoli Loan Waiver Scheme) लाभ तातडीने मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड, पासबुक आणि मोबाईल क्रमांकासह e-KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकांनीही शाखास्तरावर विशेष कॅम्प घेऊन ही प्रलंबित कामे लवकरात लवकर निकाली काढावीत अशी मागणी होत आहे. जर वेळेत KYC पूर्ण न झाल्यास अनेक पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू शकतात त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.