Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली अंत्योदय महिला

हिंगोली जिल्ह्यातील ३९,७०५ अंत्योदय महिला लाभार्थ्यांना मिळणार मोफत साड्या

Hingoli Antyodaya women: हिंगोली जिल्ह्यातील ३९,७०५ अंत्योदय महिला लाभार्थ्यांना मोफत साड्या मिळणार. या उपक्रमांतर्गत दर्जेदार साड्यांची अपेक्षा. वितरण मे किंवा जून महिन्यात होणार.


हिंगोली जिल्ह्यातील ३९७०५ अंत्योदय महिला लाभार्थ्यांना मिळणार मोफत साड्या

Hingoli Antyodaya women |

हिंगोली (Hingoli Antyodaya women) : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ३९ हजार ७०५ पात्र महिला कार्डधारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मे किंवा जून महिन्यात स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्यासोबत या (Hingoli Antyodaya women) साड्यांचे वितरण होईल. राज्यभरात एकूण २४.८२ लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यापैकी मराठवाड्यातील ३.८२ लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे. मराठवाडा विभागात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७८ हजार ६९२ तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ३९ हजार ७०५ लाभार्थी आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून शासनामार्फत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत साड्या दिल्या जातात. मात्र मागील वर्षी साड्यांचा दर्जा अत्यंत खराब असल्याने अनेक ठिकाणी लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. काही संघटनांनी साड्यांची होळी करून निषेधही नोंदवला होता. यंदा साड्यांचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाकडून १०० साड्यांचे एक गठ्ठा याप्रमाणे तालुकास्तरीय गोदामांमध्ये पुरवठा केला जाणार आहे. तेथून स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत साड्यांचे गठ्ठे पोहोचवले जातील. त्यानंतर मे किंवा जून महिन्यात धान्यासोबत साड्यांचे वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. 

जिल्हा पुरवठा विभागाकडून तालुकास्तरावर (Hingoli Antyodaya women) साड्यांचा साठा पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थी महिलांनी आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानात चौकशी करून वेळेत साड्या घेऊन जाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा दर्जेदार साड्या मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related to this topic: