Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली तहसील कार्यालयातील कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सखोल आढावा

Collector Rahul Gupta: हिंगोलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभाग, पृथ्वीराज वितरण योजना इत्यादी प्रलंबित कामांचे तत्काळ निपटण्याच्या मुद्द्यांवर आढावा घेतला.


हिंगोली तहसील कार्यालयातील कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सखोल आढावा

Collector Rahul Gupta |

 

प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे दिले निर्देश

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली तहसील कार्यालयास भेट देऊन तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे आणि नागरिकाभिमुख सेवांचा सखोल आढावा घेत त्यांनी कामकाजात गती, अचूकता व पारदर्शकता राखण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उप जिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार विविध प्रपत्रांची पूर्तता, शासकीय व गायरान जमिनींची सद्यस्थिती, शर्तभंग प्रकरणांचा शोध, फेरफार प्रकरणे, ॲग्री स्टॅक नोंदणी, पीएम-किसान योजनेअंतर्गत नोंदणी, शेतरस्त्यांच्या अर्जांची निर्गती, पीक्यूजे प्रणालीचा प्रभावी वापर तसेच बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यावर भर देत नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नोंदींची अचूकता तसेच महसूल कामकाजात पारदर्शकता राखण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.

या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासमवेत हिंगोली येथील शासकीय धान्य गोदामाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी धान्य साठवणुकीची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी उपलब्ध धान्यसाठ्याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना दर्जेदार धान्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धान्य साठवणूक व वितरण व्यवस्थेमध्ये आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.