Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासासाठी तातडीने पाठपुरावा करा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासाबाबत आवश्यक तो पाठपुरावा करून प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना


प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासासाठी तातडीने पाठपुरावा करा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta |

100 हेक्टर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारणीची शक्यता तपासण्याच्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचना

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रांच्या विकासाबाबत आवश्यक तो पाठपुरावा करून प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील प्रस्तावित अतिरिक्त हिंगोली एमआयडीसी अंतर्गत कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, दाभाडी व कुर्तडी येथील सामायिक क्षेत्रातील 432.26 हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. तसेच मौजे कामठा, येलकी, जरोडा व डोंगरगाव पूल येथील सामायिक क्षेत्रातील 205-79 हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रस्तावित क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही व पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

यासोबतच जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर लॉजिस्टिक पार्क उभारता येईल का, याची शक्यता तपासून त्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित दोन्ही एमआयडीसी क्षेत्रांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून नियमित पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक अनिल कदम, व्यवस्थापक रविंद्र पत्की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या भूमापक श्रीमती एस. व्ही. फड तसेच संबंधित गावांचे तलाठी उपस्थित होते.

येलकी येथील सशस्त्र सीमा दलाच्या बटालियनला भेट

या दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील 16 वी बटालियन सशस्त्र सीमा दलाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कळमनुरी येथील नमो गार्डनला भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच ढोलक्याची वाडी येथील व्यायामशाळेला भेट देऊन पाहणी केली. कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्याचीही त्यांनी पाहणी करून रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्ह्यात औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच विविध विकासकामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

Related to this topic: