Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली मेघगर्जना

हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Hingoli Heavy Rain: भारतीय हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा इशारा जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील काही तासांत वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट


हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा इशारा नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Hingoli Heavy Rain |

हिंगोली (Hingoli Heavy Rain) : भारतीय हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा इशारा जारी केला आहे. जिल्ह्यात पुढील काही तासांत वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट आणि विजा चमकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिंगोली उप-जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण असून तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पश्चिम-वायव्य दिशेने ताशी 10 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. उद्या जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश तर किमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Hingoli Heavy Rain) वीज चमकत असताना नागरिकांनी झाडाखाली, मोकळ्या शेतात किंवा उंच ठिकाणी थांबू नये. शक्यतो पक्क्या घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी वीज आणि गडगडाट सुरू असताना शेतातील कामे टाळावीत. तसेच विजेचे खांब, मोबाईल टॉवर आणि धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ स्थानिक शासकीय यंत्रणा, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. वीज पडण्याच्या थेट सूचना मिळवण्यासाठी नागरिकांनी हवामान विभागाचे 'दामिनी लाइटनिंग' मोबाइल अॅप वापरावे. गरज नसल्यास प्रवास टाळावा आणि विजेच्या तारा तुटलेल्या आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे.

Related to this topic: