राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव आणि युवानेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
हिंगोली (Hingoli, Farmer Dialogue) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव आणि युवानेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनानंतरचा हा त्यांचा पहिलाच हिंगोली दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दौऱ्यादरम्यान सकाळी ९:३० वाजता हिंगोली येथील राष्ट्रवादी भवन येथे आमदार रोहित पवार शेतकरी आणि शेतमजुरांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवाद बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून, त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर प्रमुख उपस्थित राहणार असून, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शेतकरी संवाद बैठकीस हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड यांच्यासह आयुबभाई पठाण, डॉ. संतोष बोंढारे, धीरज काकडे, यशवंतराव देशमुख, गजानन गव्हाणे, शहराध्यक्ष मुजीब पठाण, मोईन बागवान व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.