Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली उद्योग केंद्र

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा

Hingoli Industry Centre: हिंगोली जिल्हा उद्योग केंद्राच्या बैठकीत विविध रोजगार निर्मिती योजनांचा आढावा घेण्यात आला, ज्यामुळे जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.


जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा

Hingoli Industry Centre |

रोजगार निर्मितीत हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (Hingoli Industry Centre) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, स्थानिक रोजगार निर्मिती, आजारी उद्योग पुनर्वसन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत डीएलटीपीसी सभा तसेच निर्यात प्रचालन सभा आदींचा समावेश होता. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी तसेच उद्योजक संघटनेचे श्री. मामडे, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रवीण सोनी, अतुल बेरळीकर, नितीन काबरा, केशव काबरा आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सहकारी औद्योगिक वसाहती तसेच (Hingoli Industry Centre) एमआयडीसीमधील पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1000 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 838 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून या कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच जिल्हा उद्योग केंद्राला देण्यात आलेले 600 प्रकल्पांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी विविध योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. शेवटी (Hingoli Industry Centre) जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related to this topic: