Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत उद्या घेणार हिंगोली जिल्ह्याचा आढावा

Commissioner G. Srikanth: छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे उद्या हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, या दौ-यात ते विविध विकासकामांचा व प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा


विभागीय आयुक्त जी श्रीकांत उद्या घेणार हिंगोली जिल्ह्याचा आढावा

Commissioner G. Srikanth |

हिंगोली (Commissioner G. Srikanth) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे उद्या हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, या दौ-यात ते विविध विकासकामांचा व प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, निवडणूक, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, तसेच विविध प्रलंबित विषयांचा विभागनिहाय बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (Commissioner G. Srikanth हे आढावा घेणार आहेत.

बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय जमिनीची उपलब्धता, डेटा सेंटरसाठी जमीन संपादन, ग्रामीण वस्तींसाठी शासकीय जमिनीचे वाटप, डिजिटल क्रॉप सर्व्हे, जमीन संकलनाशी संबंधित विविध प्रकरणे तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा, भूसंपादनाची प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती मदत, गौण खनिज, वसुली, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, कर्मचारी समाधान शिबिर तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यांसाठी सुचविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबतही चर्चा होणार आहे.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, विभागीय आयुक्त प्रलंबित कामांचा आढावा घेणार आहेत.