Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आ. तान्हाजी मुटकुळे

अतिक्रमण नोटीसला घाबरू नका; घरे नियमित करणार- आ. तान्हाजी मुटकुळे

MLA Tanhaji Mutkule: हिंगोलीमध्ये नागरिकांना शांतता मिळाली आहे. शहरातील रिसाला बाजार आणि फलटण मोंढा भागातील अतिक्रमण नोटिसांबद्दल हिंगोली विधानसभेच्या आ. तान्हाजी मुटकेअमदार


अतिक्रमण नोटीसला घाबरू नका घरे नियमित करणार- आ तान्हाजी मुटकुळे

MLA Tanhaji Mutkule |

हिंगोली शहरातील फलटण नवा मोंढा रिसाला बाजार भागातील रहिवाशांना दिलासा 
लवकरच महसूल मंत्र्यांची भेट घेतली जाणार

हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : शहरात पलटण मोंढा आणि रिसाला बाजार भागात अतिक्रमण संदर्भात नागरिकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांच्या घराच्या जागेवर सातबारा उतार्‍यामध्ये 'सरकार' असे नमूद आहे, अशाच लोकांना या नोटिसा मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, २०११ पूर्वीच्या सर्व रहिवाशांची घरे शासन निर्णयानुसार नियमित केली जाणार असून, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन हिंगोली विधानसभेचे आ. तानाजीराव मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी केले. रिसाला बाजार परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण कॉर्नर बैठकीत आमदार मुटकुळे बोलत होते. यावेळी नगरसेवक हमीद प्यारेवाले, अ‍ॅड. राजु गोटे, शहराध्यक्ष रजनिश पुरोहित, अ‍ॅड. के.के.शिंदे, अ‍ॅड. अमोल जाधव, कंत्राटदार नईम खान यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांशी संवाद साधताना आमदार तानाजीराव मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) म्हणाले की, फलटण मोंढा आणि रिसाला बाजार भागातील ही घरे आजची नसून, जवळपास दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीची जुनी घरे आहेत. या भागातील नागरिकांचे पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य आहे. त्यामुळे केवळ सातबारा उतार्‍यावर 'सरकार' नाव आहे म्हणून कोणाचेही घर पाडले जाणार नाही. २०११ पूर्वी जे नागरिक वास्तव्यास आहेत, त्यांना हक्काचे घर नियमित करून देण्याचा स्पष्ट जीआर सरकारने काढलेला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मुटकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. 'उद्याच या भागातील सर्व नागरिकांची आवश्यक ती कागदपत्रे जमा केली जातील. त्यानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा संपूर्ण विषय त्यांच्या कानावर घातला जाईल आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल,' अशी ग्वाही त्यांनी दिली.

सरकार तर्पेâ १५०० स्क्वेअर फूट एवढी जागा नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य करून दिली जाणार आहे. जर एखाद्या नागरिकाची जागा १५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त असेल, तर त्या अतिरिक्त जमिनीवर अगदी नॉमिनल (नाममात्र) टॅक्स भरून ती जागा देखील संबंधित नागरिकाच्या नावावर करून दिली जाईल.  या संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेऊन काही जण नागरिकांची दिशाभूल करण्याची किंवा आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिसाला बाजार आणि फलटण मोंढा भागातील नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना किंवा कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. आमदार म्हणून मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे,' असे जाहीर आवाहन आमदार तानाजीराव मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी यावेळी केले.

Related to this topic: