Chirag Shah Dargah Lake: हिंगोली शहरातील चिराग शहा बाबा दर्गा परिसराच्या तलावाचे नूतनीकरणाला आ. तान्हाजीराव मुटकुळे व पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे.
आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्याकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यातर्फे १४ कोटींचा निधी मंजूर
हिंगोली (Chirag Shah Dargah Lake) : शहराचा ऐतिहासिक वारसा आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिरागशहा बाबा दर्गा (Chirag Shah Dargah Lake) परिसरातील तलावाच्या नूतनीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी १२ एप्रिल रविवार रोजी या विकासकामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली आणि कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.
या (Chirag Shah Dargah Lake) तलावाच्या नूतनीकरणासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नरहरी झिरवाळ यांनी १४ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. हा तलाव पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत असून, जिल्हा परिषदेमार्फत हे काम पूर्ण केले जात आहे.जुन्या काळात या तलावाचे बांधकाम करताना त्याला कोणताही मजबूत पाया नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचल्यावर धोका निर्माण होत असे. आता मात्र आधुनिक पद्धतीने खोलवर पाया खोदून अत्यंत दर्जेदार काम केले जात आहे,' अशी माहिती आ.मुटकुळे यांनी यावेळी दिली.तलावाला लागूनच असलेल्या ऐतिहासिक दर्ग्याला दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत होता.

दर्ग्यात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी (Chirag Shah Dargah Lake) दर्ग्याला संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण केले जात आहे.पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाहणी दौर्यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासोबत नगरसेवक हमीद प्यारेवाले, अॅड. राजेश गोटे,शासकीय कंत्राटदार आसारामजी घुगे, भाजपा शहराध्यक्ष रणजीत पुरोहित, प्रफुल सोनवणे, पकंज बारहाते, चंद्रकांत कांदे पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. हिंगोली शहराच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्तर वाढण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.