Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बुद्धिबळ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद; इंद्रजीत महेंद्रकर याने पटकावले चषक

एक मे महाराष्ट्र दिनी हिंगोली येथे चेस क्लबच्या वतीने भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


बुद्धिबळ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद इंद्रजीत महेंद्रकर याने पटकावले चषक

Hingoli Chess Tournament |

हिंगोली (Hingoli Chess Tournament) : एक मे महाराष्ट्र दिनी हिंगोली येथे चेस क्लबच्या वतीने भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ज्यामध्ये अहिल्यानगर येथील इंद्रजीत महेंद्रकर याने प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले.

हिंगोली येथील चेस क्लबच्या वतीने एक मे रोजी महावीर भवन येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते व जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक 12 हजार रुपये व चषक अहिल्यानगर येथील इंद्रजीत महेंद्रकर याने पटकावला तर द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये व चषक आशिष चौधरी व तृतीय पारितोषिक 4 हजार रुपये व चषक चंद्राणी श्लोक हिने पटकावला.

स्पर्धेच्या आयोजनाकरिता संचालिका ऋतुजा पांडे, प्रणव पांडे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेकरिता नांदेड, पुणे, हैदराबाद येथून पंच उपस्थित होते.

Related to this topic: