Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली बसस्थानक हल्ला

हिंगोलीतील बसस्थानकात वाहकावर प्राणघातक हल्ला

Hingoli Bus Stand Attack: प्रवाशासोबत अर्ध्या तिकीटाच्या कारणावरून घडलेल्या वादाच्या घटनेत २ जुलै रोजी हिंगोली बसस्थानकात काही जणांनी वाहकास जबर मारहाण केल्याने बराचवेळ बससेवा बंद ठेवण्यात आली होती.


हिंगोलीतील बसस्थानकात वाहकावर प्राणघातक हल्ला

Hingoli Bus Stand Attack |


आंदोलनामुळे बराचवेळ वाहतुक ठप्प; दाखल झालेल्या गुन्ह्यात ८ आरोपींना पकडले

हिंगोली (Hingoli Bus Stand Attack) : प्रवाशासोबत अर्ध्या तिकीटाच्या कारणावरून घडलेल्या वादाच्या घटनेत २ जुलै रोजी हिंगोली बसस्थानकात काही जणांनी वाहकास जबर मारहाण केल्याने बराचवेळ बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत बससेवा सुरू केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाहक व चालकांनी घेतला होता. यामध्ये हिंगोली शहर पोलिसात ९ जणांवर गुन्हा दाखल होऊन ८ जणांना अटक करण्यात आली. 

हिंगोली आगारातून गुरूवारी सकाळी ७ च्या सुमारास ताकतोडा मार्गे गोरेगावला बस सोडण्यात आली होती. ही बस केंद्रा येथून हिंगोलीकडे येत असताना एका प्रवाशासोबत अर्ध्या तिकीटावरून वाहक संजय लक्ष्मण अडकीने याचा वाद झाला. त्यानंतर ही बस हिंगोली बसस्थानकात आल्यानंतर  सदर ठिकाणी जमलेल्या काही जणांनी अचानक बसमध्ये चढून वाहक संजय अडकीने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अडकीने जखमी होऊन रक्त बंबाळ झाले. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

ही (Hingoli Bus Stand Attack) सर्व घटना बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. यानंतर ही बस पोलिस ठाण्यात नेण्यात आली. बसमधील दोघा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वाहकासह चालकाने आगाराच्या प्रवेश व्दारावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह दिलीप लेकुळे, गणेश लेकुळे, संजय तोडेवाले, ज्ञानेश्वर मरळे यांनी घटनास्थळी जाऊन चालक व वाहकाशी चर्चा केली. जोपर्यंत आरोपी अटक केले जाणार नाही.

तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा चालक  व वाहकांनी घेतला आणि जोपर्यंत परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका घेतली. काही वेळानंतर परभणी विभागीय कार्यालयातील विभागीय वाहतुक निरीक्षक संदिप साळुंके, सुरक्षा व दक्षता अधिकारी अनिल काळबांडे यांनी हिंगोली आगारात येऊन चालक व वाहकासोबत चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात बसवाहक संजय लक्ष्मण अडकीने यांनी फिर्याद दिली. ज्यामध्ये ते शासकीय कर्तव्यावर असताना दिलीप गणपत सिरसाट रा. तळेगाव यांने तिकीट काढण्यावरून वाद घालून हिंगोली बसस्थानकात बेकायदेशीररित्या जमाव जमवून विशाल दिलीप सिरसाट रा. पिंपरी खु व राहूल भिकाजी पुंडगे रा. ढेगज या दोघांनी लोखंडी पंच व हातातील कड्याने अडकीने यांच्या डोक्यात मारून थापड बुक्याने मारहाण करून जखमी केले.

तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली शहर पोलिसात विशाल दिलीप सिरसाट रा. पिंपरी खु., राहूल भिकाजी पुंडगे रा. ढेगज, दिलीप गणपत सिरसाट, अजय सोनाळे रा. तळेगाव, बाळू प्रल्हाद राठोड, संतोष बांगर रा. वंजारवाडा हिंगोली, सुभाष करे रा. देवाळा, कृष्णा सिरोळे रा. सावंगी, पिराजी राठोड रा. गांगलवाडी या ९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी तपासचक्र फिरवून यातील ८ आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के हे करीत आहेत.

काही वेळ बस सेवा ठप्प
मारहाणीची घटना (Hingoli Bus Stand Attack) घडल्यानंतर दुपारी १२ वाजता वाहक व चालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. विशेष म्हणजे यावेळेमध्ये आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बसस्थानकात ताटकळत बसावे लागले. दुपारी १.३० नंतर बससेवा सुरळीत चालू झाली.

Related to this topic: