भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार यादी परिनिरीक्षण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
हिंगोली (Hingoli BJP Meeting) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘SIR’ मतदार यादी परिनिरीक्षण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा प्रभारी संजय कौडगे, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, आतिश दांडेगावकर, उज्वला तांभाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘बूथ हीच पक्षाची खरी ताकद’ - संजय कौडगे
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांनी शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांशी संवाद साधला. "बूथ हीच पक्षाची खरी ताकद असून, आगामी काळात प्रत्येक बूथ सक्षम करणे हे आपले उद्दिष्ट आहे," असे ते म्हणाले. ‘SIR’ मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच, लवकरच होणाऱ्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा सरचिटणीस सुनिताताई मुळे, उमेश नागरे, उमेश सोमाणी, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, पवन उपाध्ये, दिलीपराव देसाई, शशिकांत वडकुते, श्रीरंग राठोड, मंदाकिणी चव्हाण यांच्यासह माणिक लोढे, उमेश गुठ्ठे, कैलास शहाणे, ॲड. राजू गोटे, ॲड. सुनील भुक्तर, मिनाक्षी जामकर, दिनकर कोकरे, वर्षा खंदारे, सर्जेराव दिंडे, कैलाश श्रिनाथ, संदीप वाकडे, अशिष जयस्वाल, सुनिल राठौर, बाबा घुगे, समिर भिसे, अशिष शर्मा, अंकुश जैस्वाल, कोटकर, गुड्डू देवकते, शेख अतिक, चांदु लांडगे, शांतीरत्न थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.