घरकुलधारकांसाठी दिलासा; पाच ब्रास वाळू मोफत 

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची वाळूअभावी रखडलेली बांधकामे आता मार्गी लागणार आहेत.

घरकुलधारकांसाठी दिलासा; पाच ब्रास वाळू मोफत 

Hingoli Administration

उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती

हिंगोली (Hingoli Administration): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची वाळूअभावी रखडलेली बांधकामे आता मार्गी लागणार आहेत. हिंगोली व सेनगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 24 एप्रिल ला दिली. 

जिल्ह्यात वाळू मिळत नसल्याने अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत होती. पावसाळा तोंडावर आल्याने बांधकामे पूर्ण करण्याची चिंता लाभार्थ्यांना सतावत होती. लाभार्थ्यांच्या मागणीनंतर उपविभागीय अधिकारी घुटुकडे व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या समितीने मोफत वाळू वाटपाचा निर्णय घेतला.
 
हिंगोली तालुक्यात कयाधू नदीवरील आमला घाटावरून २९४ ब्रास, इडोळी ९९ ब्रास, हिंगणी ६१ ब्रास, खरबी ७० ब्रास तर खंबाळा घाटावरून १०९ ब्रास वाळू वाटप होणार आहे. २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसांत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन लाभार्थ्यांना वाळू नेता येणार आहे. सेनगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनीही परमीट घेऊन स्वतःच्या वाहनाने वाळू वाहतूक करावी, असे आवाहन समाधान घुटुकडे यांनी केले.

दरम्यान, हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणेदेखील नियमित केली जाणार आहेत. यात हिंगोली शहरातील रिसाला बाजार व सेनगाव येथील इंदिरानगर भागाचा समावेश आहे. शहरातील लाभार्थ्यांनी नगरपालिकेकडे तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर करावीत. पथकांमार्फत सर्वेक्षण झाल्यानंतर समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणे नियमित केली जातील, असेही समाधान घुटुकडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजला मिळाल्या पीजीच्या ३२ जागा

हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजला मिळाल्या पीजीच्या ३२ जागा

Hingoli's Medical College: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ३२ जागा मिळाल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात या नवीन जागांवर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती नॅशनल मेडिकल कौन्सिल

Nov 06, 2026
हिंगोली जिल्ह्यातील २ लाख १२ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटींची दिवाळी अग्रीम मदत

हिंगोली जिल्ह्यातील २ लाख १२ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटींची दिवाळी अग्रीम मदत

Hingoli Drought-Affected farmers: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या दिवाळी अग्रीम मदतीअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ७६० शेतकऱ्यांच्या बँक

Nov 06, 2026
हिंगोलीत मानवतेचा दीप: जिल्हा रुग्णालयातील साई माऊली अन्नछत्रात नागरे परिवारातर्फे एक महिना महाप्रसाद

हिंगोलीत मानवतेचा दीप: जिल्हा रुग्णालयातील साई माऊली अन्नछत्रात नागरे परिवारातर्फे एक महिना महाप्रसाद

Hingoli Sai Mauli Annachhatra: हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दूरदूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, कार्यरत 'श्री साई माऊली अन्नछत्र..

Nov 06, 2026
दिवाळीच्या नावाखाली २,००० रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका; सायबर सेलचे नागरिकांना आवाहन

दिवाळीच्या नावाखाली २,००० रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका; सायबर सेलचे नागरिकांना आवाहन

Hingoli Cyber ​​Cell: सणासुदीच्या काळात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. दिवाळीच्या नावाखाली बनावट लिंकद्वारे सायबर फसवणुकीचा धोका वाढला असून...

Nov 05, 2026
भूखंडांचे अभिलेख अद्यावत करूनच दस्त नोंदणी करण्याचे आदेश

भूखंडांचे अभिलेख अद्यावत करूनच दस्त नोंदणी करण्याचे आदेश

Hingoli Land Plot Document Registration: जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्तरावर मंजूर लेआऊट, कमी जास्त पत्रक असतानाही व्यवहारात गैर प्रकार होऊ शकतात. यामध्ये भूखंडांची दुहेरी नोंदणी

Nov 05, 2026