Retired Employees Pension: जि.प. च्या अनागोंदी प्रकारामुळे पेन्शन मिळत नसल्याने पेन्शनरची प्रलंबीत पेन्शन प्रकरणे विलंबाने काढत असल्यामुळे भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेकडे निवेदन
हिंगोली (Retired Employees Pension) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारखेला जि.प. च्या अनागोंदी प्रकारामुळे पेन्शन मिळत नसल्याने पेन्शनरची प्रलंबीत पेन्शन प्रकरणे विलंबाने काढत असल्यामुळे भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचा-यांचे सेवा निवृत्ती वेतन अदा करण्यासाठी शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध झाला असतानाही हिंगोली जि.प. मधील अधिकारी व कर्मचारी जाणून बुजून त्रास देतात. जिल्हा परिषद हिंगोली मध्ये मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्ती वेतन धारक आहेत. ज्यांचे वय आज रोजी ७० ते ८० च्या वया दरम्यानचे पेन्शनर जास्तीत जास्त आहेत.
ज्यांना नीट चालता येत नाही बोलता येत नाही. अशा कर्मचाऱ्यांना त्रास देणे ही लाजिरवाणी बाब आहे निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्तीवेतन दर महिन्याचे एक तारखेला करण्याबाबत शासनाने परिपत्रक देखील जारी केले आहे तसेच म.रा.जि.प.व पंस लेखासंहिता १९६८ च्या परिच्छेद ३ वेतन व भत्ते) मधील नियम क्रमांक ७० (१) नूसार निवृत्ती वेतन व भत्ते महिन्याच्या १ तारखेस करावे अशी नियमात तरतूद आहे.
परंतु आपण स्वतः देखील कधीतरी निवृत्त होणार हे माहित असताना देखील (Retired Employees Pension) सेवानिवृत्त धारकांना कार्यालयाचे चकरा मारायला लावतात हिंगोली जि.प. देत दर महिन्यात काहीतरी तांत्रिक अडचण दाखवून निवृत्ती वेतन अदा करीत नाही वयोवृद्ध ज्येष्ठ सेवानिवृत्ती वेतनधारक दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. जसे की पक्षघात कर्करोग, हृदय विकार किडनी दमा, सोरायसीस मुळव्याध, अपेंडेक्स ईत्यादी आजाराने त्रस्त असतात याव्यतिरिक्त आकस्मित आजार दररोज सामना करावा लागतो. वैद्यकीय तपासणी उपचार औषधी खरेदी इत्यादी अडीअडचणी उद्भवत असतात म.रा.जि.प. सेवानिवृत्त. नि. कर्मचारी संघटना हिंगोली यांचे कडून दरमहा पाठपुरावा करूनही प्रत्येक महिन्यात काहीतरी अडचणी सांगून दरमहा निवृत्तीवेतन साठी विलंब होतो.
शासनाकडून निधी वेळेवर प्राप्त झाला तरीही कोषागारात पेन्शनचे बिल लवकर सादर करण्यात येत नाही कारण देयक कोषागरात उशिराने सादर झाल्यामुळे निवृती वेतन खात्यावर जमा होण्यास विलंब होतो. बिल कोषागारात सादर केले तरी कोणीही कर्मचारी पाठपुरावा करीत नाही कोषागारात बिल पाठपुरावा करण्यासाठी जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्याकडे कामाची जबाबदारी सोपवावी सध्या वर्ग चार कर्मचारी वर काम सोपवले आहे त्यामुळे अडचणी निर्माण होतात आज पर्यंत हिंगोली जिल्हा परिषद ने एक तारखेस निवृत्त वेतन केलेले नाही व तसेच सेवानिवृत्तीचे प्रकरणे सुद्धा लवकर निकाली काढण्यात येत नाही.
शिक्षण विभागातील कर्मचारी सुधीर नरवाडे कनिष्ट सहाय्यक है जुन-२०१९ मध्ये सेवानिवृत्त होऊन देखील त्यांना आजपर्यंत सेवानिवृत्तीचा लाभ मिळालेला नाही त्याना व्यजासहित सेवा निवृत्ती चा लाभ देण्यात यावा. मोहम्मद बेग शाखा अभियंता यांचे गट विमाचे देक वित्त विभागातून जाणूनबुजून काहीतरी आक्षेप लावून ४,५ वेळा श्री दुधाटे हे परत करत आहे. त्यामुळे त्यांना आजपर्यंत गट विमा योजनेची रक्कम मिळालेली नाही. हफिज वाहन चालक प. स. कळमनुरी यांना जवळ पास सेवा निवृत्त होऊन वर्षे झाले अजून गट विमा योजनेची रक्कम मिळाली नाही. दुधाटे अर्थ विभाग यांनी गट विमा योजनेचा धनादेश तीन महिन्या पूर्वी तयार करतात परंतू संबंधितांना देण्यात आला नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शेख जावेद, सचिव देवीदास पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.