Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली हरभरा गोदाम

पहिल्याच पावसात वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान

Hingoli Gram Warehouse: वखार महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमधील गोदामावर पावसातील वादळाने टिनपत्रे उडले. त्यामुळे साठवणूक केललेल्या ४००० मेट्रीक टन हरभराने भिजल्याने दुसऱ्या स्तराचे आर्थिक नुकसान


पहिल्याच पावसात वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान

Hingoli Gram Warehouse |

हिंगोली (Hingoli Gram Warehouse) : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर गोदाम घेतले आहे. या गोदामावरील पत्रे वादळी वार्‍याने उडाल्याने जवळपास ४ हजार मेट्रीक टन हरभरा या पावसाने भिजला. ज्यामध्ये जवळपास २० कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीत वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर घेतला आहे. मध्यंतरी नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला हरभरा यामध्ये साठवणुक करण्यात आला आहे. जवळपास ४ हजार मेट्रीक टन हरभरा या गोदामामध्ये साठवणुक केला होता. विशेष म्हणजे हरभरा साठवणुकीसाठी दिलेल्या निकषाला व्यवस्थापकीय मंडळाने तिलांजली दिली होती. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास वातावरणात कमालीचा बदल घडुन (Hingoli Gram Warehouse) हिंगोली शहरासह परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या वादळी वार्‍यामुळे वखार महामंडळाच्या गोदामावरील टिनपत्रे उडुन गेली. ज्यामुळे गोदामात साठवणुक केलेला हरभरा पावसामुळे भिजला. त्यामुळे जवळपास २० कोटी रुपयापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. 

१४ जून रोजी वखार मंडळाचे विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांच्या पथकाने तात्काळ भेट देऊन पाहणी केली. यावेळी वखार महामंडळाचे सचिन जाधव, नामदार यांच्यासही पथकाने भेट दिली. सदर ठिकाणी सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून त्यानंतरच नुकसानीचा निश्चित आकडा समजु शकेल.