Pimpaldari bus service: गावातील बससेवा अचानक बंद झाल्याने शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरी करणारे, व्रीद्द नागरिकांना मोठ्या दिक्कतांचा सामना करावा लागतो. पिंपळदरीत बससेवेचे तात्काळ पुनर्सुरू
मानव विकासच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी
हिंगोली (Pimpaldari bus service) : पिंपळदरी परिसरात मागील 15 दिवसांपासून एसटी बससेवा पूर्णपणे बंद असल्याने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दैनंदिन प्रवासासाठी एकमेव आधार असलेली बससेवा अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरदार, शेतकरी व वृद्ध नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. गेल्या पंधरवड्यापासून एकही बस गावात न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा व शाळा चुकवावी लागत आहे. खासगी वाहनांचा खर्च परवडत नसल्याने गरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. बाजारपेठ, दवाखाना व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठीही नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ दखल घेऊन मानव विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्या तातडीने पूर्ववत कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय औंढा-पिंपळदरी तसेच कळमनुरी-पिंपळदरी मार्गे औंढा या दोन्ही मार्गांवरील बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात, जेणेकरून विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर होईल, असेही घोंगडे यांनी म्हटले आहे.
पिंपळदरी हा ग्रामीण व दुर्गम भाग असल्याने येथे (Pimpaldari bus service) बससेवा हीच मुख्य दळणवळणाची सोय आहे. सलग 15 दिवस सेवा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करून बससेवा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.