New Income Tax Act: हिंगोली येथे नवीन आयकर कायदा २०२५ चे जनजागृती चा कार्यक्रम आयकर विभाग यांचे मार्फत घेण्यात आला नवीन आयकर कायदा आणि त्यातील तरतुदी बाबत विस्तृत माहिती
हिंगोली (New Income Tax Act) : हिंगोली येथे नवीन आयकर कायदा २०२५ चे जनजागृती चा कार्यक्रम आयकर विभाग यांचे मार्फत घेण्यात आला नवीन आयकर कायदा आणि त्यातील तरतुदी बाबत विस्तृत माहिती यावेळी उपस्थित कर दाते यांना देण्यात आली.
हा (New Income Tax Act) आयकर कायदा एप्रिल २०२६ पासुन लागू झाला असून हा नवीन आयकर कायदा आणण्या मागचे कारण म्हणजे जुन्या आयकर कायद्यातील अनेक शब्दाच्या व्याख्या आणि बिनकामाचे वेगळे वेगळे पोट नियम यामुळे जुना आयकर कायदा हा फार किचकट झाला होता आताचे आर्टिफिशिअल इंटेलेजन्स चे काळात हा कायदा सुधारित होने ही काळाची गरज बघून त्या मध्ये बदल केले असल्याचे परभणी येथून आलेले प्रमुख वक्ते सिए अनुप शुक्ल यांनी सांगितले.
आयकर अधिकारी संजय रडके यांनी प्रास्ताविक करताना सुलभ भाषा आणि कमी कलमे, वाक्यांची पुनर्रचना, कलमांची संख्या घटवली, पूर्वी करप्रणालीत 'मागील वर्ष' आणि 'कर निर्धारण वर्ष अशा दोन वेगवेगळ्या संकल्पनांमुळे संभ्रम निर्माण व्हायचा. आता या दोन्ही ऐवजी 'कर वर्ष' ही एकच सुटसुटीत संकल्पना लागू करण्यात आली आहे. जर काही कारणास्तव मुदतीत आयटीआर फाईल करू शकला नाही, तरीही कापलेल्या टीडीएसचा रिफंड मागण्याची लवचिकता नवीन कायद्याने दिली आहे.
जुन्या नियमांनुसार यासाठी मोठा दंड लावला जायचा, रिवाईज्ड रिटर्नसाठी वाढीव मुदत, टीडीएस आणि टीसीएस नियमांचे सरळीकरण, मानवी हस्तक्षेप कमी करून भ्रष्टाचार आणि करदात्यांचा छळ थांबवण्यासाठी फेसलेस असेसमेंट आणि संपूर्ण डिजिटल प्रणालीवर भर देण्यात आला आहे. यामुळे करविषयक नोटिसींचे प्रमाण कमी होऊन वादांचे निवारण जलदगतीने होईल या नवीन कायद्यामुळे कर आकारणीची 'प्रक्रिया' सोपी झाली आहे.
नवीन आयकर प्रणाली ही करदात्यांवरचा मानसिक ताण कमी करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असे सांगितले.
प्रश्नोत्तरांच्या संवादात परभणीचे सीए अनुप शुक्ल यांनी उत्तरे दिली. यावेळी जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सभासद, डॉक्टर, छोटे व्यावसायिक, कर सल्लागार, सिए, वकील आणि करदाते उपस्थित होते.
वंदेमातरमने कार्यक्रम याची सुरवात झाली, तर राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले. या कार्यक्रमास हिंगोली चकोले, आयकर कार्यालयाचे ईतर कर्मचारी तसेच हिंगोली जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, प्रकाश सोनी, उद्योजक संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, व्यापारी महासंघाचे हिंगोली शहराध्यक्ष पंकज अग्रवाल , वसमतचे सुभाष लालपोतु, आणि जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर सल्लागार संघटनेचे सिए राजेश सोमाणी, सिए महेश बियाणी, अँड अशोक डुब्बेवार, अँड. दिलीप झंवर , सिए संकेत सोमाणी, सिए निखिल अग्रवाल यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचलन अँड. पंकज जोशी यांनी केले तर आभार आयकर कार्यालय प्रमुख किशोर झाडे यांनी मानले.