खानापूर चित्ता (Highway Accident) : बुधवार २ एप्रिल रोजी मध्यरात्री अंदाजे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर कांदा व लसूण घेऊन जाणारे दोन वाहन रस्त्याच्या कडेला खाली उतरून खोलदरीत गेल्याने या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये मध्यरात्री शासकीय रुग्णवाहिकेद्वारे हलविण्याची माहिती मिळाली आहे.
हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक १६१ वर खानापूर चित्ता जवळ २ एप्रिल रोजी मध्यरात्री अंदाजे दोन अडीच वाजण्या सुमारास ट्रक क्रमांक आर.जे.09 GE 1356 लसणाने भरलेला भार वाहतूक करणारा ट्रक पिकअप वाहनाला जोराची धडक देऊन रस्त्याच्या कडेला उतरून त्या पाठोपाठ महिंद्रा पिकप क्रमांक एम एच ३० बि डी 6279 हा कांदा घेऊन जाणार पिकप रस्त्याच्या कडेला उतरून त्यामध्ये पिकप चालक दिलीप दयाराम करवते रा. टोसगाव तालुका पातुर जिल्हा अकोला तर पिकप मधील जखमी मुरलीधर त्र्यंबक पोवाले रा. तोसगाव व ट्रक मधील कमल सिंह जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळालेली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील पिकअप क्रमांक एम एच 30 बिडी 62 79 हा कांदे घेऊन नांदेड येथील बाजारामध्ये जात असताना खानापूर चित्ताजवळील राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकने पिकप ला जोराची धडक दिल्याने पिकप व ट्रक रोडच्या खाली उतरून दरीत गेल्याने पिकप चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी मध्ये पिकप मधील एक तर ट्रक मधील एक आहे. सदरील अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे, बीट अमलदार अनिल डुकरे सहकारी वाटोरे, गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन मृत व जखमींना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असताना मागील वर्षी याच ठिकाणी दोन मोटर सायकल स्वाराचा अपघात होऊन दोन जण मृत्यू झाले होते. त्याच ठिकाणी हे दोन वाहन रस्त्याच्या खाली उतरून खोलदरीत गेल्याने दोन वाहनांमधील पिकपमधील चालक ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालू असतानाही अपघात घडलेल्या जखमींना कोणीतरी अज्ञातानी 102 वर कॉल करून जागेची ठिकाण सांगितल्याने त्वरित कळमनुरी रुग्णालयाची रुग्णवाहिका दाखल होऊन सदरील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.