Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गो सन्मान महारॅली

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा; हिंगोलीत 'गो सन्मान महारॅली'ला प्रतिसाद

Gau honor rally: गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि देशातून गोवधाचे कलंक मिटावे यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंगोलीत  २७ जुलै रोजी सोमवारी भव्य 'गो सन्मान महा रॅली'चे आयोजन


गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा हिंगोलीत गो सन्मान महारॅलीला प्रतिसाद

Gau honor rally |

हिंगोली (Gau honor rally) : गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि देशातून गोवधाचे कलंक मिटावे यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंगोलीत  २७ जुलै रोजी सोमवारी भव्य 'गो सन्मान महा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.

गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे, गोसेवेला प्रोत्साहन द्यावे आणि गोवध थांबवावा या मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  ही रॅली बद्रीनारायण मंदिर गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या दरम्यान काढण्यात आली होती. रॅलीमध्ये 'यही समय है दर्शक नहीं सहभागी बने' असा नारा देत गोमातेच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असे आवाहन देखील करण्यात आले.

रॅलीमध्ये 'गोमाता की जय', 'गोमाता राष्ट्रमाता' आणि 'गो सेवा देश सेवा' अशा घोषणा देत मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि युवा वर्ग भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना निवेदन देण्यात आले. या रॅलीचे आयोजन सकल हिंदू समाज, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related to this topic: