Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Helicopter Technical Fault

उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

गडचिरोली दौऱ्यावर निघालेले शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.


उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

गडचिरोली दौऱ्यावर निघालेले शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे रवाना होण्यापूर्वीच पायलटच्या लक्षात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

उदय सामंत हे गडचिरोलीतील सूरजागड परिसराच्या पाहणी दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठी ते नागपूरहून हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे जाण्याच्या तयारीत होते. मात्र, उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड निदर्शनास आल्याने पुढील प्रवासाबाबत परिस्थिती निर्माण झाली.

पायलटने वेळीच तांत्रिक समस्या ओळखल्याने हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Related to this topic: